शिक्षकांच्या थकीत वेतनाचे ६७ लाख हायकोर्टात जमा
By Admin | Updated: July 14, 2015 03:05 IST2015-07-14T03:05:56+5:302015-07-14T03:05:56+5:30
बुलडाणा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सोमवारी शिक्षकांच्या थकित वेतनाचे ६७ लाख २७ हजार रुपये

शिक्षकांच्या थकीत वेतनाचे ६७ लाख हायकोर्टात जमा
नागपूर : बुलडाणा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सोमवारी शिक्षकांच्या थकित वेतनाचे ६७ लाख २७ हजार रुपये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जमा करून आदेशाच्या अवमाननेप्रकरणी विनाशर्त क्षमा मागितली.
यासंदर्भात चिखली येथील संत गुलाबबाबा विद्यालयाच्या भास्कर शेळके यांच्यासह एकूण १२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी रिट याचिका दाखल केली आहे. रक्कम जमा करण्यासंदर्भात पहिल्यांदा १० जूनपर्यंत वेळ देण्यात आला होता. यानंतर २२ जूनपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली होती. यानंतरही आदेशाचे पालन करण्यात आले नाही. परिणामी न्यायालयाने शिक्षणाधिकाऱ्यांना १३ जुलै रोजी व्यक्तिश: उपस्थित राहून आदेशाच्या अवमाननेची कारवाई का करण्यात येऊ नये यावर स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शिक्षणाधिकारी थकित वेतनाच्या धनादेशासह न्यायालयात हजर झाले. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. पुरुषोत्तम पाटील यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)