शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र बंददरम्यान नागपुरात हजारो आंदोलकांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 10:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरेगाव भीमा प्रकरणाचा निषेध नोंदवताना विना परवानगी रॅली काढून, टायर जाळणे, रस्ता अडवून घोषणाबाजी करणे तसेच वाहतुकीस अडसर निर्माण केल्याच्या आरोपाखाली शहरातील पाच वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात एक हजारपेक्षा जास्त भीमसैनिकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले.कोरेगाव भीमा प्रकरणाचे संतप्त पडसाद बुधवारी शहरात उमटले. वेगवेगळ्या भागात संतप्त जमावाने बुधवारी ...

ठळक मुद्देकोरेगाव भीमा प्रकरणपाच पोलीस ठाण्यात वेगवेगळी नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरेगाव भीमा प्रकरणाचा निषेध नोंदवताना विना परवानगी रॅली काढून, टायर जाळणे, रस्ता अडवून घोषणाबाजी करणे तसेच वाहतुकीस अडसर निर्माण केल्याच्या आरोपाखाली शहरातील पाच वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात एक हजारपेक्षा जास्त भीमसैनिकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले.कोरेगाव भीमा प्रकरणाचे संतप्त पडसाद बुधवारी शहरात उमटले. वेगवेगळ्या भागात संतप्त जमावाने बुधवारी सकाळपासून रात्रीपर्यंत रॅली काढून, टायर जाळून, दगडफेक करून रस्ता अडवून आपला रोष व्यक्त केला. असा प्रकार होऊ नये म्हणून यापूर्वीच सहपोलीस आयुक्तांनी नागपुरात मनाई आदेश जारी केला होता. त्याला न जुमानता हे प्रकार घडले.सीताबर्डी पोलीस ठाण्यात सर्वाधिक १४ अधिक ५०० आंदोलकांवर (१४ आंदोलकांची नावे आहेत. त्यांच्यासोबत असलेले ५०० आंदोलक)गुन्हे दाखल झाले. टायर जाळणे, रस्ता अडविणे, सरकारविरोधी घोषणाबाजी करीत पोलिसांना अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोपही लावण्यात आला असून आंदोलकांविरुद्ध कलम १४३, १४७, १४९, ११७, ४२७, ४३५, ३४१ भादंवि, सहकलम ७ (क्रिमिनल लॉ अमेडमेंट अ‍ॅक्ट १९३२)तसेच मुंबई पोलीस कायदा १३५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. अशाच प्रकारे जरीपटका पोलिसांनी ३०० आंदोलकांविरुद्ध टायर जाळणे, रस्ता अडवून धरण्यासोबतच जमावाने मेट्रोच्या बॅरिकेडस्वर तसेच पोलिसांवर दगडफेक करण्याचा आरोप लावला. पोलिसांना शिवीगाळ केल्याचाही आरोप लावून इंदोºयातील जमावावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.पाचपावली पोलीस ठाण्यात १५० आंदोलकांवर गैरकायद्याची मंडळी जमविणे, रस्ता अडविणे, टायर जाळून मनाई आदेशाचे उल्लंघन करणे आणि बेकायदेशीरपणे व्यापारी प्रतिष्ठाने बंद करणे असे आरोप लावण्यात आले आहे. यामुळे पाचपावलीतील बाजारपेठेत अंदाजे १० लाखांच्या उलाढालीचे नुकसान झाल्याचाही आरोप पोलीस पत्रकात नमूद आहे.शताब्दी चौक तसेच अजनी परिसरात अशाच प्रकारे आंदोलन करणाऱ्या ४० आंदोलकांवर अजनी ठाण्यात गुन्हे दाखल झाले. त्याचप्रमाणे जुनी कामठी पोलीस ठाण्यात नागपूर - रामटेक बसवर दगडफेक केल्याप्रकरणी चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :agitationआंदोलन