शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

आज धावणार हजारो नागपूरकर : राज्यभरातील खेळाडूही दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 23:34 IST

लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने आयोजित भोजवानी फूड्स प्रस्तुत नागपूर महामॅरेथॉन स्पर्धेचा महाकुंभ रविवारी (दि.११) कस्तूरचंद पार्कवर भरणार आहे.

ठळक मुद्देमहामॅरेथॉनचा महाकुंभ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने आयोजित भोजवानी फूड्स प्रस्तुत नागपूर महामॅरेथॉन स्पर्धेचा महाकुंभ रविवारी (दि.११) कस्तूरचंद पार्कवर भरणार आहे. ‘मी धावतो माझ्यासाठी’ हा संदेश देण्यासाठी होणाऱ्या महामॅरेथॉनमध्ये हजारो धावपटू धावणार आहेत. यानिमित्ताने राज्यातील विविध भागांतील धावपटू नागपुरात डेरेदाखल झाले असून, ऐतिहासिक महामॅरेथॉन पर्वासाठी समस्त नागपूरकरदेखील सज्ज झाले आहेत.महामॅरेथॉन स्पर्धेची प्रतीक्षा आता संपली असून, रविवारी पहाटे ५ वाजेपासून कस्तूरचंद पार्कवर धावपटूंचा मेळा भरणार आहे. या स्पर्धेविषयी शहरात कमालीचा उत्साह संचारला आहे. गेल्या महिनाभरापासून या स्पर्धेविषयीची उत्सुकता असून, संपूर्ण शहर हे मॅरेथॉनमय झाले आहे.सकाळी ६.३० वाजता २१ कि.मी. अर्धमॅरेथॉनला हिरवी झेंडी दाखविण्यात येईल. त्यानंतर ६.४५ वाजता १० कि.मी., सकाळी ७ वाजता पाच कि.मी. आणि ७.१५ वाजता तीन कि.मी. फॅमिली रनला सुरुवात होणार आहे. कार्यक्रमाचे आकर्षण असलेली ‘दिव्यांग रन’ एक कि.मी. अंतराची असेल. त्याआधी मैदानावर महामॅरेथॉन उद्घाटनाचा नेत्रदीपक आणि रंगारंग असा सोहळा रंगणार आहे. यावेळी झुंबा डान्सचे कलावंत धावपटूंचा उत्साह वाढविणार आहेत.क्रीडाविश्वात या महामॅरेथॉनमुळे उत्साह संचारला आहे. सर्वच गटांतील मॅरेथॉनमध्ये नागपूरकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला असून, आंतरराष्ट्रीय धावपटूंसह शहरातील आबालवृद्ध, व्यावसायिक, उद्योजक, अधिकारीवर्ग, संरक्षण दलातील सैनिक आणि हौशी धावपटू या मॅरेथॉनमध्ये धावणार आहेत. दरम्यान, या स्पर्धेसाठी मॅरेथॉन मार्गावर नियोजन करण्यात आले असून, रॅली मार्गावर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त, स्वयंसेवक तसेच मार्गदर्शक असणार आहेत.

टॅग्स :Marathonमॅरेथॉनnagpurनागपूर