गळतीमुळे हजारो लीटर पाण्याची नासाडी()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:07 IST2021-01-02T04:07:44+5:302021-01-02T04:07:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या पेंचच्या २३०० एमएम जलवाहिनीला गळती सुरू झाल्याने हजारो लिटर पाण्याची ...

गळतीमुळे हजारो लीटर पाण्याची नासाडी()
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या पेंचच्या २३०० एमएम जलवाहिनीला गळती सुरू झाल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. याचा परिणाम नागपूर शहरातील पाणीपुरवठ्यावर होत असल्याने जलवाहिनीची तात्काळ दुरुस्ती करा, असे निर्देश मनपाचे स्थायी समिती अध्यक्ष विजय झलके यांनी दिले.
झलके यांनी पेंच येथून पुरवठा होत असलेल्या २७ किमीच्या जलवाहिनीची गुरुवारी पाहणी केली. जलप्रदाय समिती उपसभापती भगवान मेंढे, नगरसेवक दीपराज पार्डीकर, अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर आदी उपस्थित होते.
पाहणीदरम्यान चार ठिकाणी गळती असल्याचे आढळून आले. २७ किलोमीटरच्या संपूर्ण क्षेत्रात पारशिवनी, इटगाव, करमभाड या भागामध्ये चार ठिकाणी गळती निदर्शनास आली. यापैकी इटगाव येथे मोठे लिकेज असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. पाण्याची गळती बंद करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश झलके यांनी दिले.
.........
बंधाऱ्यामुळे प्रवाह बाधित
बिना (संगम) जवळील कोलार नदीवर बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधाऱ्यामुळेही पुढे पाण्याचा प्रवाह बाधित होत असल्याचे निदर्शनास आले. नदीचा प्रवाह मोकळा होऊन पाण्याचा सुरळीत पुरवठा व्हावा, यादृष्टीनेही आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश विजय झलके यांनी दिले.