लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्मार्ट सिटीच्या दिशेने उपराजधानीची वाटचाल सुरू आहे. स्वच्छ शहराच्या यादीत अग्रक्रमावर येण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहे. शहरात उघड्यावर कचरा टाकून परिसरात घाण करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने उपद्रव शोध पथक गठित केले आहे. २ एप्रिलपासून घाण करणाऱ्यांना दुप्पट दंड आकारला जाणार आहे. दंड आकारण्याचे अधिकार स्वच्छता दूत म्हणून निवड करण्यात आलेल्या माजी सैनिक ांना देण्यात आले आहे.सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून परिसर अस्वच्छ करणाऱ्यांकडून दंड वसुलीचे अधिकार पथकाला दिले आहे. पथकामुळे सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याला काही प्रमाणात आळा बसला आहे. दोषीवर कठोर कारवाई झाल्यास शहर स्वच्छ होण्याला मदत होणार असल्याने दंडाच्या रकमेत दुपटीने वाढ करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला होता. याला यापूर्वी स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. १ एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावाणी केली जाणार होती. मात्र १ एप्रिलला सुटी असल्याने आज २ एप्रिलपासून याची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार यांनी दिली.प्रत्येक प्रभागात दोन अशाप्रकारे ३८ प्रभागात ७६ तसेच झोन स्तरावर अधिकारी व एक पथक प्रमुख अशा ८७ माजी सैनिकांची नियुक्ती करावयाची होती. मात्र या पथकात सध्या ४१ जवानांचा समावेश आहे.
नागपुरात उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांना आता दुप्पट दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 11:24 IST
शहरात उघड्यावर कचरा टाकून परिसरात घाण करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने उपद्रव शोध पथक गठित केले आहे. २ एप्रिलपासून घाण करणाऱ्यांना दुप्पट दंड आकारला जाणार आहे.
नागपुरात उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांना आता दुप्पट दंड
ठळक मुद्देआजपासून अंमलबजावणीपथक करणार कारवाई