नागपूर : ‘उडवून द्या लग्नाचा बार!’ असे म्हणत घराघरांत लगीनघाईचा गजर सुरू झाला आहे. दिवाळीचा उजेड ओसरला, पण आता मंगलध्वनींची चाहूल लागली आहे. मात्र, या आनंदाच्या हंगामात ग्रह मात्र थोडेच मेहरबान राहणार? कारण यंदा विवाहासाठी फक्त ४९ दिवस शुभमुहूर्त, तर मुंजींसाठी अवघे २० दिवस शुभकाळ आहेत, अशी माहिती आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी दिली.
गुरूचा अस्त आणि शुक्राचा अस्त यामुळे यावर्षीचे ग्रहसंयोग विवाहयोगासाठी फारसे अनुकूल नाहीत.
विवाहाचे शुभमुहूर्तनोव्हेंबर २०२५ : २२, २३, २५, २६, २७, ३०डिसेंबर २०२५ : २, ५फेब्रुवारी २०२६ : ६, ७, १०, ११, १२, २०, २१, २२, २५, २६मार्च २०२६ : ५, ७, ८, १४, १५, १६एप्रिल २०२६ : २१, २६, २८, २९, ३०मे २०२६ : १, ३, ६, ८, ९, १०, १३, १४जून २०२६ : १९, २३, २४, २७जुलै २०२६ : १, ३, ४, ७, ८, ११
मुंजीचे शुभमुहूर्त
फेब्रुवारी २०२६ : ६, १९, २२, २६, २७मार्च २०२६ : ८, २०, २९एप्रिल २०२६ : ३, ८, २१, २२, २८मे २०२६ : ३, ६, ७, ८जून २०२६ : १६, १७, १९