नागपुरातील वनक्षेत्र परिसरात ‘थर्टी फर्स्ट’वर बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 11:02 AM2019-12-28T11:02:53+5:302019-12-28T11:03:20+5:30

मुख्यालयाने दिलेल्या आदेशानुसार संरक्षित वनक्षेत्रातील विश्रामगृह दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

Thirty first ban on forest area in Nagpur | नागपुरातील वनक्षेत्र परिसरात ‘थर्टी फर्स्ट’वर बंदी

नागपुरातील वनक्षेत्र परिसरात ‘थर्टी फर्स्ट’वर बंदी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवीन वर्षानिमित्त अनेक लोक वन पर्यटनाला जातात व तिथे नवीन वर्षाची पार्टी करतात. परंतु यंदा वन विभागाने यावर बंदी घातली आहे. ३१ डिसेंबर ते १ जानेवारीदरम्यान वनकर्मचारी वनांमध्ये देखरेख ठेवणार आहे.
वन कर्मचाऱ्यांचे एक पथक टायगर रिझर्व्ह, अभयारण्य व राष्ट्रीय उद्यान क्षेत्रात रात्री गस्त घालणार आहे. वन मुख्यालयाने दिलेल्या आदेशानुसार संरक्षित वनक्षेत्रातील विश्रामगृह दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. नागझिरामध्ये वनविभागाचे दोन सरकारी रेस्ट हाऊस आहेत. पेंच, बोर टायगर रिझर्व्ह, उमरेड-कºहांडला व टिपेश्वर अभयारण्यातील रेस्ट हाऊस संरक्षित क्षेत्राबाहेर आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वनविभागाचे रेस्ट हाऊस वन अधिकाऱ्यांशिवाय कुणालाही न देण्याचे आदेश आहेत. परंतु संरक्षित क्षेत्राबाहेरील पर्यटकांचे रेस्ट हाऊस सुरू राहतात. नवीन वर्षानिमित्त ३१ डिसेंबर व १ जानेवारीला जंगल सफारीसाठी बुकींग फुल्ल असतात. अशा स्थितीत पर्यटक व अन्य लोकांकडून वनांच्या क्षेत्रात पार्टी करण्याची शक्यता असते. हे लक्षात घेता वन मुख्यालयाने सर्व टायगर रिझर्व्ह, अभयारण्य व्यवस्थापनाला विश्रामगृह बंद ठेवण्याचे सोबतच रात्री दोन दिवस गस्त लावण्याचे निर्देश दिले आहेत. वनक्षेत्रात पार्टी होताना आढळल्यास संबंधितांवर भारतीय वन अधिनियम १९२७ व वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे.

Web Title: Thirty first ban on forest area in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.