एकाच दुकानात तिसऱ्यांदा चाेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:10 IST2020-12-02T04:10:11+5:302020-12-02T04:10:11+5:30
पाटणसावंगी : चाेरट्यांनी एकाच दुकानात तिसऱ्यांदा चाेरी करण्याचा प्रयत्न केला. आधीच्या दाेन घटनांमध्ये चाेरट्यांनी राेख रकमेसह मुद्देमाल चाेरून नेला ...

एकाच दुकानात तिसऱ्यांदा चाेरी
पाटणसावंगी : चाेरट्यांनी एकाच दुकानात तिसऱ्यांदा चाेरी करण्याचा प्रयत्न केला. आधीच्या दाेन घटनांमध्ये चाेरट्यांनी राेख रकमेसह मुद्देमाल चाेरून नेला हाेता. यावेळी मात्र त्यांच्या हाती काहीही लागले नाही. ही घटना खापा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील वाकाेडी येथे शनिवारी (दि. २८) मध्यरात्री घडली असून, संपूर्ण घटनाक्रम दुकानातील ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
झामाजी दलाल, रा. वाकाेडी, ता. सावनेर यांचे वाकाेडी येथे दलाल हार्डवेअर नामक दुकान आहे. चाेरट्यांनी याआधी जुलै २०२० मध्ये त्यांच्या दुकानात दाेनदा चाेरी केली हाेती. चाेरट्याने पहिल्यांदा त्यांच्या दुकानातील ५ लाख ३५ हजार रुपयाचा तर दुसऱ्यांदा १,४०० रुपयाचा मुद्देमाल चाेरून नेला हाेता. या दाेन्ही चाेऱ्या आठवडाभराच्या अंतराने घडल्या हाेत्या. यात चाेरट्याला अटक करण्यात आली हाेती. त्यानंतर चाेरट्यांनी याच दुकानात शनिवारी मध्यरात्री चाेरी करण्याच्या उद्देशाने प्रवेश केला हाेता.
दाेघांनी दुकानाच्या दाराची कडी ताेडून आत प्रवेश केला. त्यांनी दुकानातील कॉम्प्युटर, कॅमेरा लेन्स, लाॅकर व इतर बाबी तपासल्याचे ‘सीसीटीव्ही कॅमेऱ्यात’ कैद झाले आहे. मात्र, यावेळी चाेरट्यांच्या हाती काहीही लागले नाही, अशी माहिती झामाजी दलाल यांनी पाेलिसांना दिली. दुकानात चाेरटे शिरल्याचे लक्षात येताच त्यांनी पाेलिसात तक्रार नाेंदविली. याप्रकरणी खापा पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ३८०, ४५७, ५११ अन्वये गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.