गाेंडखैरी येथे लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:08 IST2021-03-14T04:08:37+5:302021-03-14T04:08:37+5:30

गाेंडखैरी : स्थानिक प्राथमिक आराेग्य केंद्रात काेराेना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात करण्यात आली. या आराेग्य केंद्रात शनिवार (दि. १३)पर्यंत ...

The third phase of vaccination begins at Gandkheri | गाेंडखैरी येथे लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू

गाेंडखैरी येथे लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू

गाेंडखैरी : स्थानिक प्राथमिक आराेग्य केंद्रात काेराेना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात करण्यात आली. या आराेग्य केंद्रात शनिवार (दि. १३)पर्यंत एकूण ६१८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यात १३६ ज्येष्ठ नागरिकांसह ४५ ते ५९ वर्षे वयाेगटातील ५५ नागरिकांचा समावेश आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डाॅ. हर्षल शिंदे यांनी दिली.

या प्राथमिक आराेग्य केंद्रात जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. सेलाेकर यांच्या मार्गदर्शनात १ मार्चपासून काेराेना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. पहिल्या टप्प्यात ६० पेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून, दुसऱ्या टप्प्यात ४५ ते ६० वर्षे वयाेगटातील आजार असणाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. तिसऱ्या टप्प्यात ४५ ते ५९ वर्षे वयाेगटातील आजार नसणाऱ्यांचे लसीकरण केले जात असल्याची माहिती तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. दीपा कुळकर्णी यांनी दिली. यावेळी आराेग्य केंद्रात जिल्हा परिषद सदस्य देवानंद कोहळे, खंडविकास अधिकारी महेंद्र डोंगरे, पंचायत समिती सदस्य विजय भांगे, तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. दीपा कुळकर्णी, वैद्यकीय अधिकारी डाॅ. हर्षल शिंदे, सरपंच चांगदेव कुबडे, पशुवैद्यकीय अधिकारी सुधाकर माहुरे, प्रभाकर भोसले, सचिव हितेंद्र फुले, तलाठी केशव कुटे, प्रदीप चनकापुरे, शंकर देशमुख उपस्थित हाेते.

Web Title: The third phase of vaccination begins at Gandkheri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.