शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

नागपुरात बुधवारपासून सुरू होणार तिसरे कारागृह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 23:51 IST

कारागृहातील लॉकडाऊनच्या पाश्­र्वभूमीवर नागपुरात बुधवारपासून तिसरे कारागृह सुरू होणार आहे. अजनी चौकातील माऊंट कारमेल शाळेत हे तात्पुरते कारागृह सुरू केले जाणार असून बुधवारपासून तेथे नवीन कैद्यांना ठेवले जाणार आहे.

ठळक मुद्देमाऊंट कारमेल शाळेत कारागृह : नवीन कैद्यांना ठेवणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कारागृहातील लॉकडाऊनच्या पाश्­र्वभूमीवर नागपुरात बुधवारपासून तिसरे कारागृह सुरू होणार आहे. अजनी चौकातील माऊंट कारमेल शाळेत हे तात्पुरते कारागृह सुरू केले जाणार असून बुधवारपासून तेथे नवीन कैद्यांना ठेवले जाणार आहे.कारागृहात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सरकारने अनेक ठिकाणी पर्यायी कारागृहांची व्यवस्था केली. त्यानुसार नागपुरात मध्यवर्ती कारागृहाच्या बाजूला असलेल्या मंगलम लॉन सभागृहात महिनाभरापूर्वी दुसरे कारागृह सुरू करण्यात आले होते. मात्र या सभागृहाची आणि तेथील खोल्यांची क्षमता लक्षात घेता आता जास्त कैदी तेथे राहू शकत नसल्याने नवीन कैद्यांना कुठे ठेवायचे, असा प्रश्­न निर्माण झाला होता. त्यामुळे कारागृहाचे अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांनी तिसऱ्या कारागृहासाठी पर्यायी व्यवस्था करून देण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. कारागृहाच्या बाजूच्याच अजनी चौकात माउंट कारमेल शाळा आहे. सध्या शाळांना सुट्टी असल्यामुळे या शाळेत अस्थायी स्वरूपाचे कारागृह सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली होती. ती जिल्हा प्रशासनाकडून सोमवारी मंजूर करण्यात आली. त्यामुळे मंगळवारी दिवसभर शाळेत कारागृह प्रशासनाने आवश्यक त्या सोयीसुविधा निर्माण केल्या. बुधवारी हे तात्पुरते कारागृह सुरू केले जाणार आहे.दीडशे कैदी ठेवणारया तात्पुरत्या नवीन कारागृहात दीडशे कैदी राहतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे संख्याबळ ५० च्या घरात राहील, अशी माहिती कारागृह अधीक्षक कुमरे यांनी दिली.

टॅग्स :jailतुरुंगnagpurनागपूर