देहविक्रीविरुद्धच्या कारवाईत नागपूर देशात तिसरे

By Admin | Updated: September 7, 2016 02:50 IST2016-09-07T02:50:23+5:302016-09-07T02:50:23+5:30

उपराजधानीत देहव्यापार मोठ्या प्रमाणावर फोफावत आहे काय? प्राप्त झालेली अनैतिक व्यापार प्रतिबंधक

Third in the country in action against the sale of milk | देहविक्रीविरुद्धच्या कारवाईत नागपूर देशात तिसरे

देहविक्रीविरुद्धच्या कारवाईत नागपूर देशात तिसरे

पुणे-मुंबईलाही टाकले मागे : १३५ प्रकरणांची नोंद
राहुल अवसरे नागपूर
उपराजधानीत देहव्यापार मोठ्या प्रमाणावर फोफावत आहे काय? प्राप्त झालेली अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गतच्या (पिटा) कारवाईची आकडेवारी या शंकेला बळकटी आणणारी आहे.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने २०१५ च्या गुन्हेगारीची आकडेवारी आपल्या संकेत स्थळावर लोड केली. त्यात ही पिटा कारवाईची बाब पुढे आली आहे. पिटाचे संपूर्ण देशात २०१४ मध्ये २५३९ आणि २०१५ मध्ये २६४१ गुन्हे दाखल करण्यात आले. ही वाढ ३.८६ टक्के आहे.
या कारवाईत महाराष्ट्राचा क्रमांक तिसरा आहे. पहिला क्रमांक तामिळनाडुचा असून ५११ प्रकरणे दाखल आहेत. त्याखालोखाल कर्नाटक येथे ४२३ आणि महाराष्ट्रात ४०० प्रकरणे दाखल आहेत.
पिटाच्या कारवाईत नागपूर शहर हे देशात तिसरे आहे. बंगळुरु हे पहिल्या क्रमांकावर असून २३६ प्रकरणे दाखल करण्यात आलेली आहेत. त्याखालोखाल चेन्नईचा क्रमांक असून २०१ प्रकरणे दाखल आहेत. नागपुरात १३५ प्रकरणे दाखल आहेत. २०१५ साली वर्षभर झालेल्या कारवाईने नागपूरने मुंबई आणि पुण्यालाही मागे टाकले आहे. मुंबई येथे ८५ आणि पुणे येथे ६३ गुन्हे दाखल आहेत.
२०१४ मध्ये नागपुरात पिटाचे केवळ २४ गुन्हे दाखल होते. पुणे येथे ६१ आणि मुंबई येथे ५८ गुन्हे दाखल आहेत. (प्रतिनिधी)

विदेशी बालाही आढळल्या
नागपूर हे देशाच्या मध्यस्थानी आहे. या शहराला इतर शहरांपेक्षा सुरक्षित समजल्या जात असल्याने मोठमोठ्या टाऊनशिप झटपट उभ्या राहत आहे. मेट्रोसिटीचा दर्जा मिळाल्याने ‘स्टार’ हॉटेल्स उभारले जात आहे. त्याबरोबरच पॉश देहव्यापारही फोफावत आहे.
पिटा अंतर्गत घालण्यात आलेल्या बहुतांश धाडी फ्लॅट आणि पॉश हॉटेलच्या आहेत. बऱ्याच ठिकाणच्या धाडीत रशियन, आयर्लंड आणि नेपाळी बाला आढळल्या आहेत.

Web Title: Third in the country in action against the sale of milk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.