शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

चालकाचे हातपाय बांधून ट्रक पळविला; नागपूर-भंडारा महामार्गावरील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2022 17:31 IST

त्या चौघांनी चालकाचे हातपाय बांधून त्याला सीटखाली दाबले. त्याच्याकडील १० हजार रुपयांचा माेबाईल फाेन व डिक्कीतीन दाेन हजार रुपये हिसकावून घेतले.

ठळक मुद्दे१३ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास

माैदा (नागपूर) : अनाेळखी चाैघांनी ट्रकच्या केबिनमध्ये प्रवेश करीत चालकास मारहाण केली आणि त्याचे हातपाय बांधून ट्रक व त्यातील साहित्य चाेरून नेले. यात चाेरट्यांनी एकूण १३ लाख १२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला, अशी माहिती ठाणेदार हेमंतकुमार खराबे यांनी दिली. ही घटना माेदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-भंडारा राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी (दि. १६) मध्यरात्री १.१५ वाजताच्या सुमारास घडली.

ट्रकचालक अक्षय वामनराव शिनपुरे (वय २६, रा. रामेश्वरी, नागपूर) हा एमएच-४०/व्हीएल-७३५० क्रमांकाच्या ट्रकमध्ये ५.५ टन रसायन आणि ३.५ टन इतर साहित्य घेऊन नागपूरहून अंबिकापूर (छत्तीसगड) येथे जाण्यासाठी निघाला हाेता. त्याने नागपूर-भंडारा महामार्गावरील महालगाव (ता. कामठी) शिवारात राेडलगत ट्रक थांबविला आणि टायर चेक करून झाेप येत असल्याने केबिनमध्ये माेबाईल बघत बसला हाेता.

दरम्यान, अनाेळखी चाैघे ट्रकच्या केबिनमध्ये शिरले. त्यांनी चेहऱ्याला दुपट्टा बांधलेला हाेता. त्या चाैघांनीही अक्षयला मारहाण करीत डिझेल कितना है, अशी विचारणा केली. त्यातच एकाने फाेनवर कुणाला तरी हम निकल रहे है, असे सांगितले. त्यांनी अक्षयचे हातपाय बांधून त्याला सीटखाली दाबले. त्याच्याकडील १० हजार रुपयांचा माेबाईल फाेन व डिक्कीतीन दाेन हजार रुपये हिसकावून घेतले. त्यांनी अक्षयला मालाची बिल्टी व पैशांबाबत विचारणा केली. त्यानंतर चाैघांनी त्याला मध्येच ट्रकखाली ढकलून देत ट्रक घेऊन पळू गेले.

यात चाेरट्यांनी एकूण १३ लाख १२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेल्याचे त्याने पाेलिसांना सांगितले. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी त्याच्या तक्रारीवरून चाैघांविरुद्ध भादंवि ३९४, ३६३, ३४ अन्वये गुन्हा नाेंदविला. या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक साेनेकर करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरी