ताजबागमध्ये शिरले चोरटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:49 IST2021-02-05T04:49:25+5:302021-02-05T04:49:25+5:30
नागपूर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत ताजुद्दीन बाबा यांच्या जन्मदिनानिमित्त ताजबागमध्ये सध्या भाविकांची प्रचंड गर्दी आहे. या गर्दीत ...

ताजबागमध्ये शिरले चोरटे
नागपूर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत ताजुद्दीन बाबा यांच्या जन्मदिनानिमित्त ताजबागमध्ये सध्या भाविकांची प्रचंड गर्दी आहे. या गर्दीत चोरटेही शिरले असून त्यांनी भाविकांची रोख तसेच दागिन्यांवर हात साफ केला आहे.
सन्यालनगरातील सुषमा अनिल लोखंडे (वय ६५) या बुधवारी दुपारी ३.४५ च्या सुमारास मोठा ताजबाग दर्गा येथे दर्शनाला आल्या होत्या. त्या रांगेत उभ्या असताना त्यांच्या बॅगमधील पर्स ज्यात रोख ५ हजार आणि सोन्याचे मंगळसूत्र होते, ती चोरट्याने लंपास केली.
या घटनेला दोन तास होत नाही तोच पुन्हा एका वृद्धाच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्याने लंपास केली. इमरान नबी मेहबूब शेख (वय ६५, रा. ठाकूर प्लॉट, टीचर कॉलनी) हे त्यांच्या नातवाला घेऊन बुधवारी सायंकाळी ६ वाजता मोठा ताजबागमध्ये दर्शनाला आले. दर्शनदीर्घेत उभे असताना चोरट्यांनी इमरान नबी यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून नेली. या दोन्ही घटनांची सक्करदरा पोलिसांकडे तक्रार झाली असून, पोलिसांनी चोरीचे स्वतंत्र गुन्हे दाखल केले. चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
------