धामणा परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:08 IST2021-08-01T04:08:53+5:302021-08-01T04:08:53+5:30

धामणा : चाेरट्यांनी नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील धामणा (ता. नागपूर ग्रामीण) परिसरात धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. त्यांनी गुरुवारी (दि. ...

Thieves are rampant in Dhamna area | धामणा परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट

धामणा परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट

धामणा : चाेरट्यांनी नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील धामणा (ता. नागपूर ग्रामीण) परिसरात धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. त्यांनी गुरुवारी (दि. २९) मध्यरात्री ट्रकचे टायर व बॅटरी चाेरून नेल्या आहेत.

सचिन हेमराज हरोडे (रा. धामणा) यांनी त्यांच्या मालकीचा ट्रक (एमएच-४०/एके-३६५६) घराच्या परिसरात उभा केला हाेता. मध्यरात्री परिसरात कुणीही नसताना चाेरट्याने त्या ट्रकचे डिस्कसह दाेन टायर काढून चाेरून नेले. त्या टायरची किंमत ६० हजार रुपये असल्याचे सचिन हराेडे यांनी सांगितले. त्यानंतर चाेरट्याने गोविंद चंद्रवंशी (रा. धामणा) यांच्या ट्रक (एमएच-०२/वायए-९७१२ व एमएच-३१/डीएस-२६८६)मधील तीन बॅटरी चाेरून नेल्या. त्या तिन्ही बॅटरींची किंमत ७५ हजार रुपये असल्याचे गोविंद चंद्रवंशी यांनी सांगितले. या चाेऱ्या शुक्रवारी सकाळी उघड हाेताच ट्रकमालकांनी पाेलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी हिंगणा पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून, या घटनांचा तपास पाेलीस कर्मचारी आशिष पाैनीकर करीत आहेत.

Web Title: Thieves are rampant in Dhamna area