एका गुन्ह्यात पकडले अन निघाला आठ दुचाकींचा चोरटा; पोलिसांची कारवाई
By योगेश पांडे | Updated: June 17, 2024 18:05 IST2024-06-17T18:04:52+5:302024-06-17T18:05:06+5:30
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या माध्यमातून समीर सिकंदर उईके (२०, खातरोड, भंडारा) याला ताब्यात घेतले

एका गुन्ह्यात पकडले अन निघाला आठ दुचाकींचा चोरटा; पोलिसांची कारवाई
नागपूर : दुचाकीचोरीच्या एका आरोपात पकडलेला आरोपी सराईत वाहनचोर निघाला व त्याच्या चौकशीतून आठ दुचाकींच्या चोरीचा उलगडा झाला. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.
५ जून रोजी तन्मन नांदूरकर (१९, महाकालीनगर) याची दुचाकी चोरी गेली होती. त्याच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या माध्यमातून समीर सिकंदर उईके (२०, खातरोड, भंडारा) याला ताब्यात घेतले. त्याने संबंधित दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
त्याची सखोल चौकशी केली असता हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतूनच त्याने एमएच ३१ डीजी ०४९२, एमएच ४९ एएच ६२६०, एमएच ४९ ए ८१४२, एमएच ३१ डीएच ९५४४, एमएच ४९ एए २४८७, एमएच ४९ एजी ८६५५, एमएच ४९ एएन १३१९ या दुचाकीदेखील चोरल्याची माहिती दिली. पोलिसांनी आठही दुचाकी जप्त केल्या आहेत. पोलीस निरीक्षक कैलास देशमाने, माधव गुंडेकर, गणेश बोंदरे, आशीष तितरमारे, चंद्रशेखर कौरती, राजेश मोते, मुकेश कन्हाके, राजेश धोपटे, मयुर सातपुते, रुबिना खान, शारदा बेहरे, सपना बांते, वंदना काटोले यांच्या पथकाने ही कारवाई केली.