चोरटा भांबावला, स्वत:ला बाथरूममध्ये बंद करून घेतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:08 IST2021-06-20T04:08:05+5:302021-06-20T04:08:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - चोरीच्या प्रयत्नात असताना अचानक दुकानमालक आल्याने भांबावलेल्या एका चोरट्याने स्वत:च स्वत:ला दुकानाच्या बाथरूममध्ये बंद ...

चोरटा भांबावला, स्वत:ला बाथरूममध्ये बंद करून घेतले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - चोरीच्या प्रयत्नात असताना अचानक दुकानमालक आल्याने भांबावलेल्या एका चोरट्याने स्वत:च स्वत:ला दुकानाच्या बाथरूममध्ये बंद करून घेतले. नंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना शुक्रवारी दुपारी घडली.
एमआयडीसीतील लोकमान्य नगरात रंजीव झलखदेव सिंग (वय ४३) यांचे हार्डवेअरचे दुकान आहे. शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी १२ च्या दरम्यान ते नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी आले. दार उघडताच त्यांना दुकानाच्या मागच्या बाजूला आवाज आला. तिकडे जाऊन बघितले असता कृष्णा गोविंद दास (वय ३७) आणि धर्मेंद्र सोमनाथ शहा (वय २६) हे दोघे दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडताना दिसले. अचानक दुकानमालक आल्याचे बघून शहा पळून गेला तर भांबावलेल्या दासने दुकानाच्या बाथरूममध्ये जाऊन बंद करून घेतले. त्याने बाथरूमचे दार आतून लावले तर सिंग यांनी बाहेरून दार लावले. नंतर आरडाओरड करून शेजाऱ्यांना गोळा केले. त्यानंतर पोलिसांना माहिती दिली. एमआयडीसी पोलिसांनी दुकानात पोहचून आरोपी दासला बाथरूममधून बाहेर काढले. नंतर त्याच्याकडून साथीदाराचे नाव, पत्ता मिळवून शहा यालाही अटक केली.