शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रमाणपत्रासाठी त्यांनी ग्रामसभेत केले लग्न !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 19:48 IST

महिला बचत गटांच्या सदस्यांनी ग्रामसेवकाच्या अरेरावीपणामुळे ग्रामपंचायतीला कुलूप लावण्याची घटना ताजी असताना नरखेड तालुक्यातील जलालखेडा ग्रामपंचायतीच्या कारभारामुळे त्रस्त असलेल्या एका जोडप्याने विवाहनोंदणीचे प्रमाणपत्र मिळण्यात होत असलेल्या प्रकाराचा निषेध करीत ग्रामसभेपुढे पुन्हा एकदा लग्न केले.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील जलालखेडा ग्रामपंचायतीतील प्रकार : प्रशासनाविरुद्ध नागरिकांचा रोष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महिला बचत गटांच्या सदस्यांनी ग्रामसेवकाच्या अरेरावीपणामुळे ग्रामपंचायतीला कुलूप लावण्याची घटना ताजी असताना नरखेड तालुक्यातील जलालखेडा ग्रामपंचायतीच्या कारभारामुळे त्रस्त असलेल्या एका जोडप्याने विवाहनोंदणीचे प्रमाणपत्र मिळण्यात होत असलेल्या प्रकाराचा निषेध करीत ग्रामसभेपुढे पुन्हा एकदा लग्न केले.जलालखेडा ग्रामपंचायतीची ग्रामसभा गुरुवारी पार पडली. तीत स्थानिक ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली. यावेळी गावातील महिला बचत गटाच्या सदस्यांना वेळेवर प्रमाणपत्र व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न करणे, कागदपत्रांसाठी वारंवार बोलाविणे, नियमाची अट टाकत वेठीस धरणे अशा शेकडो समस्यांचा पाढा आमसभेत ग्रामस्थांनी वाचला. यात गावातील नवविवाहित युवक-युवतींचे लग्नाची नोंदणी न करणे अशा कित्येक कारणाने ग्रामस्थ त्रस्त आहेत. यातच एक नवविवाहित जोडपे सुरेंद्र निकोसे यांचा अश्विनी यांच्याशी एक महिन्यापूर्वी मंदिरात व निबंधकाकडे रीतसर विवाह झाला होता. तरी ग्रामपंचायत त्यांच्या विवाहाची नोंदणी करीत नसल्यामुळे या नवविवाहित जोडप्याने खंड विकास अधिकारी व ग्रामस्थांपुढे ग्रामसभेतच एकमेकांना वरमाला टाकून विवाह केला आणि आता तरी ग्रामपंचायतने लग्न केल्याचे प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी केली.‘ग्रामविकास अधिकारी हटाव’चा नारानरखेड पं.स.चे खंडविकास अधिकारी दयाराम राठोड यांच्या उपस्थितीत झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी ग्राम विकास अधिकारी लोलुसरे हटाव जलालखेडा बचावचा नारा बुलंद केला. गावातील महिलांनी लोलुसरे यांच्या कृत्याचा पाढाच खंडविकास अधिकाऱ्यासमोर वाचला.

आजी व माजी आमदार ग्रामसभेतजलालखेडा ग्रा.पं.च्या या सर्व प्रकरणाची माहिती मिळताच या क्षेत्राचे माजी आमदार अनिल देशमुख व विद्यमान आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी गंभीर दखल घेत सरळ जलालखेडा ग्रा.पं.ची सुरू असलेली आमसभा गाठली. त्यांच्या समोरही उपस्थित महिलांनी व ग्रामवासीयांनी सचिवाच्या अभद्रपणाचा व वेठीस धरण्याच्या कार्यप्रणालीचा पाढा वाचला.महिलेने विकले दागिनेगावातील एका महिलेस मुलाच्या शिक्षणाकरिता बीपीएल प्रमाणपत्र दाखल्याची गरज होती. तिने चालू वर्षाचा घर कर न भरल्याने तू आधी कर भर नंतर तुला दाखला देतो असे सचिव लोलुसरे यांनी तिना सांगितले व दाखला देण्याकरिता टाळाटाळ केली पण परिस्थितीमुळे ती महिला चालू वर्षाचा घर कर भरण्यास सक्षम नव्हती. घर कर भरला नाही तर प्रमाणपत्र मिळत नाही व प्रमाणपत्र मिळाले नाही तर मुलाचे शैक्षणिक वर्ष वाया जाते ही परिस्थिती असूनसुद्धा लोलुसरे यांना त्या महिलेची कसलीही दया आली नाही. शेवटी त्या महिलेला आपले दागिने विकून घर कर भरावा लागला नंतरच लोलुसरे यांनी तिला बीपीएलचा दाखला दिला.

टॅग्स :marriageलग्नgram panchayatग्राम पंचायत