शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

‘ते’ अतिरिक्त पैसे मिळविण्यासाठी मागतात भिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 5:43 PM

लॉकडाऊन शिथिल होताच ते पुन्हा सक्रिय झाले आहेत. हे भिक्षेकरी भटक्या समाजातील असून ते अमरावती, धामणगाव, चंद्रपूर, अकोला, कन्हान इत्यादी शहरातून नागपुरात येतात. कन्हान येथील कुटुंबे कामठी रोडवरील चौकांमध्ये तर, अमरावती, धामणगाव, अकोला, चंद्रपूर येथील कुटुंबे अमरावती रोड, वर्धा रोड, मानेवाडा इत्यादी भागात भिक्षा मागतात, असे चौकशीत आढळून आले.

लोकमत न्यूज नेटवर्क सैयद मोबीननागपूर : लॉकडाऊनमध्ये देण्यात आलेल्या शिथिलतेमुळे शहरातील भिक्षेकरी पुन्हा सक्रिय झाले आहेत. महिला व बालके चौकाचौकात भिक्षा मागताना दृष्टीस पडत आहेत. सक्तीच्या लॉकडाऊनमध्ये ते अदृश्य झाले होते. त्यामुळे ‘लोकमत’ने याविषयी अधिक चौकशी केली असता, ते इतरही कामे करीत असल्याची व भिक्षा मागणे हा त्यांचा अतिरिक्त पैसा मिळविण्याचा मार्ग असल्याची माहिती मिळाली.सक्तीच्या लॉकडाऊनमध्ये शहर बंद होते. नागरिकांचे बाहेर जाणे-येणे अत्यंत कमी होते. त्यामुळे शहरातील भिक्षेकरी पोट भरण्यासाठी अन्य कामे करीत होते. परंतु, लॉकडाऊन शिथिल होताच ते पुन्हा सक्रिय झाले आहेत. हे भिक्षेकरी भटक्या समाजातील असून ते अमरावती, धामणगाव, चंद्रपूर, अकोला, कन्हान इत्यादी शहरातून नागपुरात येतात. कन्हान येथील कुटुंबे कामठी रोडवरील चौकांमध्ये तर, अमरावती, धामणगाव, अकोला, चंद्रपूर येथील कुटुंबे अमरावती रोड, वर्धा रोड, मानेवाडा इत्यादी भागात भिक्षा मागतात, असे चौकशीत आढळून आले.ही आहेत राहण्याची ठिकाणेशहरातील भिक्षेकरी यशवंत स्टेडियम, संत्रा मार्के ट व रामझुल्याजवळ राहतात. संत्रा मार्केटमधील कुटुंबे ट्रकमधील माल रिकामा करण्याचे काम करतात. त्यातून मिळणाऱ्या पैशातून त्यांची उपजीविका चालते. परंतु, अतिरिक्त पैसे मिळविण्यासाठी महिला व मुले भिक्षा मागतात.भावनेचा फायदा घेतातहे भिक्षेकरी पैसे मिळविण्यासाठी नागरिकांच्या भावनेचा फायदा घेतात. तान्ह्या बाळांना नशा देऊन बेशुद्ध केले जाते. त्यामुळे ते बाळ कोणतीही हालचाल करीत नाही. नागरिक त्यांच्यावर दया दाखवून पैसे देतात.कडक कारवाई होत नाहीया भिक्षेकऱ्यांवर कडक कारवाई होत नाही. पोलीस आणि महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी त्यांना समजावून सोडून देतात. त्याचा भिक्षेकºयांवर काहीच परिणाम होत नाही. ते पुन्हा भिक्षा मागणे सुरू करतात. यासंदर्भात ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.चोरीच्या मुलांचा उपयोगअनेकदा भिक्षा मागण्यासाठी चोरीच्या मुलांचा उपयोग केला जातो. काही दिवसापूर्वी एका महिलेने अकोला येथून मुलाला चोरले होते. त्यानंतर लॉकडाऊनमुळे ती महिला मुलाला रामझुल्याखाली सोडून निघून गेली होती. महिला व बालकल्याण विभागाने त्या मुलाला त्याच्या पालकापर्यंत पोहचवले होते.

 

 

ते अतिरिक्त पैसे मिळविण्यासाठी मागतात भिक्षासैयद मोबीननागपूर : लॉकडाऊनमध्ये देण्यात आलेल्या शिथिलतेमुळे शहरातील भिक्षेकरी पुन्हा सक्रिय झाले आहेत. महिला व बालके चौकाचौकात भिक्षा मागताना दृष्टीस पडत आहेत. सक्तीच्या लॉकडाऊनमध्ये ते अदृश्य झाले होते. त्यामुळे ‘लोकमत’ने याविषयी अधिक चौकशी केली असता, ते इतरही कामे करीत असल्याची व भिक्षा मागणे हा त्यांचा अतिरिक्त पैसा मिळविण्याचा मार्ग असल्याची माहिती मिळाली.सक्तीच्या लॉकडाऊनमध्ये शहर बंद होते. नागरिकांचे बाहेर जाणे-येणे अत्यंत कमी होते. त्यामुळे शहरातील भिक्षेकरी पोट भरण्यासाठी अन्य कामे करीत होते. परंतु, लॉकडाऊन शिथिल होताच ते पुन्हा सक्रिय झाले आहेत. हे भिक्षेकरी भटक्या समाजातील असून ते अमरावती, धामणगाव, चंद्रपूर, अकोला, कन्हान इत्यादी शहरातून नागपुरात येतात. कन्हान येथील कुटुंबे कामठी रोडवरील चौकांमध्ये तर, अमरावती, धामणगाव, अकोला, चंद्रपूर येथील कुटुंबे अमरावती रोड, वर्धा रोड, मानेवाडा इत्यादी भागात भिक्षा मागतात, असे चौकशीत आढळून आले.ही आहेत राहण्याची ठिकाणेशहरातील भिक्षेकरी यशवंत स्टेडियम, संत्रा मार्के ट व रामझुल्याजवळ राहतात. संत्रा मार्केटमधील कुटुंबे ट्रकमधील माल रिकामा करण्याचे काम करतात. त्यातून मिळणाऱ्या पैशातून त्यांची उपजीविका चालते. परंतु, अतिरिक्त पैसे मिळविण्यासाठी महिला व मुले भिक्षा मागतात.भावनेचा फायदा घेतातहे भिक्षेकरी पैसे मिळविण्यासाठी नागरिकांच्या भावनेचा फायदा घेतात. तान्ह्या बाळांना नशा देऊन बेशुद्ध केले जाते. त्यामुळे ते बाळ कोणतीही हालचाल करीत नाही. नागरिक त्यांच्यावर दया दाखवून पैसे देतात.कडक कारवाई होत नाहीया भिक्षेकऱ्यांवर कडक कारवाई होत नाही. पोलीस आणि महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी त्यांना समजावून सोडून देतात. त्याचा भिक्षेकºयांवर काहीच परिणाम होत नाही. ते पुन्हा भिक्षा मागणे सुरू करतात. यासंदर्भात ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.चोरीच्या मुलांचा उपयोगअनेकदा भिक्षा मागण्यासाठी चोरीच्या मुलांचा उपयोग केला जातो. काही दिवसापूर्वी एका महिलेने अकोला येथून मुलाला चोरले होते. त्यानंतर लॉकडाऊनमुळे ती महिला मुलाला रामझुल्याखाली सोडून निघून गेली होती. महिला व बालकल्याण विभागाने त्या मुलाला त्याच्या पालकापर्यंत पोहचवले होते.

 

टॅग्स :Beggarभिकारी