शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

वाहतूक नियम मोडणाऱ्यांची तयार होणार ‘कुंडली’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 7:26 PM

वारंवार वाहतूक नियम मोडणाऱ्यांची आता ‘कुंडली’ तयार होणार आहे. त्यासाठी शासनाने ‘ट्राफिक व्हायोलेन्स डाटाबेस’ सॉफ्टवेअर विकसित केले असून त्याच्या उपयोगितेचे प्रात्याक्षिक केले जात आहे. हे सॉफ्टवेअर येत्या सहा महिन्यांत पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केले जाणार आहे.

ठळक मुद्देशासनाची हायकोर्टात माहिती : आॅटोरिक्षांमध्ये लागणार जीपीएस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वारंवार वाहतूक नियम मोडणाऱ्यांची आता ‘कुंडली’ तयार होणार आहे. त्यासाठी शासनाने ‘ट्राफिक व्हायोलेन्स डाटाबेस’ सॉफ्टवेअर विकसित केले असून त्याच्या उपयोगितेचे प्रात्याक्षिक केले जात आहे. हे सॉफ्टवेअर येत्या सहा महिन्यांत पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केले जाणार आहे.शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती दिली आहे. वारंवार वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर प्रत्येक नवीन गुन्ह्यासाठी अधिक कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. परंतु, सध्या एका व्यक्तीने कितीवेळा वाहतूक नियम मोडले हे तपासण्याची यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे संबंधित व्यक्तीवर प्रत्येक गुन्ह्यासाठी सारखीच कारवाई केली जाते. ‘ट्राफिक व्हायोलेन्स डाटाबेस’ सॉफ्टवेअर कार्यान्वित झाल्यानंतर वाहतूक नियम मोडणाऱ्या प्रत्येकाचा डेटा गोळा होईल. संबंधित व्यक्तीने किती गुन्हे केले हे एका क्लिकवर पुढे येईल. परिणामी, त्यानुसार योग्य ती कारवाई करणे शक्य होईल. याशिवाय शासन प्रवाशांच्या सुरक्षिततेकरिता आॅटोरिक्षांमध्ये जीपीएस यंत्रणा बसविण्यावर विचार करीत आहे. यासंदर्भात विविध शक्यता पडताळल्या जात आहेत. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते परमजीतसिंग कलसी यांची जनहित याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. हर्निश गढिया यांनी बाजू मांडली.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयTrafficवाहतूक कोंडी