शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

नागपुरात ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 22:33 IST

महापालिकेच्या माध्यमातून सर्व रुग्णांना ऑक्सिजनची पूर्तता व्हावी, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही मनपाचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात ऑक्सिजनची सर्वात जास्त मागणी आहे. नागपुरात सध्या खासगी रुग्णालयात १३७७ बेडस आणि शासकीय रुग्णालयात १४५० बेडस उपलब्ध आहेत. कोविड आणि नॉन कोविड रुग्णांसाठी ४२०० जम्बो सिलेंडरची मागणी होत आहे तर शहरात ४५०० जम्बो सिलेंडरचे उत्पादन होत आहे. महापालिकेच्या माध्यमातून सर्व रुग्णांना ऑक्सिजनची पूर्तता व्हावी, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही मनपाचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी दिली.नागपुरात सध्या ३ शासकीय, २ धर्मादाय आणि ३३ खासगी रुग्णालय कोविड रुग्णांना सेवा देत आहेत. यात लवकरच नवीन कोविड रुग्णालयांची भर पडणार आहे. भविष्याची गरज लक्षात घेता आॅक्सिजनची पूर्तता करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.नागपुरात कोविड टेस्टिंगच्या संख्येमध्ये वाढ करण्यात आली आहे. अगोदर दररोज २००० ते २५०० टेस्टिंग होत होती. आता मनपा व खासगी रुग्णालयांच्या माध्यमाने ६ हजार लोकांची टेस्टिंग होत असल्याचे शर्मा यांनी सांगितले.अंतिम टप्प्यातील उपचारामुळे मृत्यूआयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या नेतृत्वात दररोज आरोग्य विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांची टीम डेथ अ‍ॅनालिसिस करीत आहे. तीन ते चार तास होणाऱ्या या आढावा बैठकीत शहरातील मृत्यूची कारणे शोधली जात आहेत. मृतांची संख्या वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे कोरोना रुग्ण अंतिम टप्प्यात रुग्णालयांमध्ये दाखल होत असल्याचे निदर्शनास आले आहे.वेळीच चाचणी कराकोरोनाची लक्षणे दिसल्यास लवकरात लवकर तपासणी करून घ्यावी. ज्येष्ठ नागरिकांनीसुद्धा कोविड चाचणी करून वेळेवर उपचार घेतल्यास त्यांचे प्राण वाचू शकतात. नागरिकांनी मनपाच्या नजीकच्या केंद्रात चाचणी करून घ्यावी, असे आवाहन जलज शर्मा यांनी केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCylinderगॅस सिलेंडर