शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सायंकाळी ६ ते सकाळी १० वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित होणार नाही; महावितरणचे आश्वासन

By कमलेश वानखेडे | Updated: May 29, 2024 17:07 IST

वाढती थकबाकी आणि वीजगळती सोबतच वीजचोरीला चाप लावण्यासाठी डिश टीव्ही रिचार्ज आणि मोबाईल रिचार्जच्या धर्तीवर ही 'प्री-पेड' स्मार्ट वीज मीटर काम करणार आहेत.

कमलेश वानखेडे, नागपूर : वाढत्या थकबाकीवर उपाय म्हणून 'जेवढे पैसे तेवढा टॉक टाइम' या मोबाइल हिशेबाच्या धर्तीवर 'जेवढे पैसे तेवढे युनीट वीज' वापरण्याची सोय असलेल्या 'प्री-पेड' स्मार्ट वीज मीटर राज्यात सर्वत्र लवकरच मोफत लावण्यात येणार आहेत. मीटर नादुरुस्त झाल्यास ते मोफत बदलून देण्यात येणार आहे. त्यामुळे वीजग्राहकांवर स्मार्ट मीटरचा कोणताही आर्थिक भुर्दंड नाही. ग्राहकांना स्मार्ट मीटरचे विविध फायदे असल्याची माहिती महावितरणने दिली आहे.

वाढती थकबाकी आणि वीजगळती सोबतच वीजचोरीला चाप लावण्यासाठी डिश टीव्ही रिचार्ज आणि मोबाईल रिचार्जच्या धर्तीवर ही 'प्री-पेड' स्मार्ट वीज मीटर काम करणार आहेत. त्यासाठी राज्यातील सर्व वीजग्राहकांकडे 'प्री-पेड' स्मार्ट वीज मीटर बसविले जाणार आहेत. प्री-पेड स्मार्ट मीटर घेणा-यांच्या बाबतीत मीटर रिडींग, बिल देणे, त्यांची वसुली करणे आणि बिल भरण्यास विलंब या गोष्टी टळणार असल्याने घरोघरी वसुलीची मोहीम राबवून आर्थिक स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सध्या तारेवरची कसरत करीत असलेल्या महावितरणने सदैव थकबाकीच्या चक्रव्युहात अडकलेल्या वीज ग्राहकांना प्री-पेड स्मार्ट मीटरचा उतारा देत वाढत्या थकबाकीला चाप लावण्याचा निर्णय घेतला आहे.

केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशात सर्वच राज्यांतील वीजग्राहकांकडे स्मार्ट मीटर लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. महाराष्ट्रामध्ये कृषी पंपांच्या वीज जोडण्या वगळता महावितरणच्या सर्व लघुदाब वर्गवारीतील 2 कोटी 41लाख वीजग्राहकांकडे हे स्मार्ट मीटर लावण्यात येणार आहे. ग्राहकांना वीज वितरणची सेवा देणारी महावितरण ही महाराष्ट्र शासनाच्या मालकीची कंपनी आहे. ना नफा, ना तोटा (रेव्हेन्यू न्यूट्रल) या तत्त्वाने वाटचाल असणाऱ्या महावितरणच्या सेवेचा केंद्रबिंदू हा फक्त आणि फक्त वीजग्राहकच आहे.

वीज बिलाच्या नियमित वसुलीसाठी राज्यभरात थकबाकी वसुली मोहीम तीव्रतेने राबविण्यात येत असून प्रत्येक कार्यालयातील एखाद दोन कर्मचारी वगळता कनिष्ठ कर्मचा-यांपासून वरिष्ठ अधिका-यापर्यंत सर्वजण वसुली मोहीमेवर असतात. याचा प्रत्यक्ष परिणाम महावितरणच्या दैंनंदिन कामावरही पडत असल्याने ग्राहक सेवा आणि देखभाल व दुरुस्तीच्या कामांवर त्याचा प्रतिकूल परिणामही जाणवत आहे. या सर्व बाबींचा विचार करीत प्री-पेड स्मार्ट मीटरचा वापर करण्याचे महावितरणने ठरविले आहे.

अशी मिळेल सुविधा-

१) स्मार्ट प्रीपेड मीटर मोबाईलप्रमाणेच रिचार्ज करण्याची सुविधा ग्राहकांना घरबसल्या ऑनलाइनद्वारे उपलब्ध होणार आहे.

२) रिचार्ज केलेल्या रकमेतून दररोज वीज किती वापरली, रक्कम किती शिल्लक आहे व रिचार्ज संपत आल्याची माहिती मोबाईलद्वारे मिळत राहील. त्यानुसार वीजवापर व त्याचे आर्थिक नियोजन करणे शक्य होणार आहे

३) स्मार्ट मीटरमधील रिचार्ज संपल्यानंतरही सायंकाळी ६ ते सकाळी १० वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित होणार नाही. - रिचार्ज संपल्यानंतर सार्वजनिक सुटीच्या दिवशी वीजपुरवठा खंडित होणार नाही.- हॅप्पी अवर्स असल्यामुळे सार्वजनिक सुटीच्या दिवशी किंवा रात्री-बेरात्री वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका नाही.

टॅग्स :nagpurनागपूरmahavitaranमहावितरण