शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
4
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
5
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
6
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
7
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
8
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
9
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
10
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
11
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
12
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
13
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
14
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
15
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
16
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
17
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
18
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
19
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
20
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
Daily Top 2Weekly Top 5

महिला पोलीस ठाण्यासाठी सायकलने फिरणार राज्यभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 21:08 IST

अन्यायग्रस्त महिला पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली की तिचा सामना पुरुष पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांशी होतो. पुरुष पोलिसांना घटनाक्रम सांगावा लागतो. घटनाक्रम सांगताना आणि पोलिसांच्या प्रश्नांना उत्तरे देताना पुन्हा आपल्यावर अन्याय होत असल्याचा भास संबंधित महिलेस होतो. त्यामुळे केंद्र शासनाच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर महिला पोलीस ठाणे सुरू करावेत, या मागणीसाठी नागपूरचे श्रीधर आडे यांनी महाराष्ट्र पिंजून काढण्याचा निर्णय घेतला आहे. सायकलने विविध जिल्ह्यांत फिरून महिलांची दोन लाख पत्रं जमा करून ते मुख्यमंत्र्यांना सादर करण्याचा मानस त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

ठळक मुद्देनागपूरच्या श्रीधर आडेंचे अभियान : महिलांचे दोन लाख पत्र सोपविणार मुख्यमंत्र्यांना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अन्यायग्रस्त महिला पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली की तिचा सामना पुरुष पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांशी होतो. पुरुष पोलिसांना घटनाक्रम सांगावा लागतो. घटनाक्रम सांगताना आणि पोलिसांच्या प्रश्नांना उत्तरे देताना पुन्हा आपल्यावर अन्याय होत असल्याचा भास संबंधित महिलेस होतो. त्यामुळे केंद्र शासनाच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर महिलापोलीस ठाणे सुरू करावेत, या मागणीसाठी नागपूरचे श्रीधर आडे यांनी महाराष्ट्र पिंजून काढण्याचा निर्णय घेतला आहे. सायकलने विविध जिल्ह्यांत फिरून महिलांची दोन लाख पत्रं जमा करून ते मुख्यमंत्र्यांना सादर करण्याचा मानस त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.नागपूर येथील न्यू मानकापूर रिंगरोड परिसरातील रहिवासी असलेला तरुण श्रीधर आडे हे डिसेंबर २०१६ पासून स्वखर्चाने, लोकवर्गणी करून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ, दहेज हटाओ’साठी राष्ट्रीय जनजागृती करतात. आतापर्यंत त्यांनी १७ हजार किलोमीटरचे अंतर सायकलने पूर्ण करून १५ राज्यांतील १६५ जिल्ह्यांत हुंडाप्रथाविरोधात लढा देण्यासाठी ५,५०० स्वयंसेवकांना एकत्र केले आहे. अभियानासाठी फिरत असताना त्यांनी सामाजिक समस्या, तेथील महिला किती सुरक्षित आहेत, त्यांना दडपणविरहित वातावरण देण्यासाठी तेथील राज्य शासनाने काय उपाययोजना केल्या, या उपाययोजनांचा महिलांना फायदा कसा होतो, याची माहिती गोळा केली. ही माहिती गोळा करीत असताना प्रत्येक राज्यात जिल्हास्तरावर महिलांसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबतीत महाराष्ट्र राज्य कमालीचे पिछाडीवर असल्याचे त्यांच्या लक्षात आले. निर्भया कांडानंतर तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी राज्यातील प्रत्येक जिल्हास्तरावर स्वतंत्र महिला पोलीस स्टेशन असावे, याबाबत सर्व राज्यांना निर्देश दिले होते. त्यानुसार देशातील २४ राज्यांत ६२२ पेक्षा अधिक स्वतंत्र महिला पोलीस ठाणे निर्माण करण्यात आले. यात तामिळनाडूत २०२, उत्तर प्रदेश ७१, पश्चिम बंगाल, बिहार व राजस्थानमध्ये प्रत्येकी ४०, कर्नाटक ३५, गुजरात २८, हरियाणा ३१ आणि झारखंडमध्ये स्वतंत्र ३० महिला पोलीस ठाणे सुरू करण्यात आली. महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण अधिक असूनही महिलांसाठी स्वतंत्र ठाणे नसल्याचे श्रीधर आडे यांना जाणवले. त्यामुळे या ज्वलंत प्रश्नासाठी त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढण्याचा निर्णय घेतला. आगामी ३० आॅगस्टपासून ते सायकलने राज्यभरात फिरणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यातून ते आपला प्रवास सुरू करणार आहेत.असे राहील अभियानश्रीधर आडे यांनी स्वतंत्र महिला पोलीस ठाण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात सायकलने फिरण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी पहिल्या टप्प्यात ११ जिल्ह्यांची निवड केली आहे. यात प्रत्येक जिल्ह्यात जाऊन ते महिला मंडळ, महिलांच्या संघटनांची भेट घेऊन जनजागृती करणार आहेत. राज्यभरातील दोन लाख महिलांकडून ते स्वतंत्र पोलीस ठाण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नावे पत्र लिहून घेतील. अभियानात ‘लोकमत’च्या सखी मंचचे सहकार्य घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. गोळा केलेले दोन लाख पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोपवून प्रत्येक जिल्हास्तरावर महिलांसाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी ते करणार आहेत.

 

टॅग्स :WomenमहिलाPolice Stationपोलीस ठाणे