शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाकडून मिहीर कोटेचांच्या कार्यालयाची तोडफोड; मुंबईत जोरदार राडा
2
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
3
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
4
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
5
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
6
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
7
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
8
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
9
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
10
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
11
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
12
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
13
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
14
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
15
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
16
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
17
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
18
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
19
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
20
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान

अभियांत्रिकीत ‘अ‍ॅक्टिव्हिटी’वर आधारित अभ्यासक्रम येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 5:00 AM

engineering Nagpur university राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत येणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयांचा अभ्यासक्रम ‘अपडेट’ करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

ठळक मुद्देनवीन सत्रापासून सुरुवात होण्याची दाट शक्यता

योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत येणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयांचा अभ्यासक्रम ‘अपडेट’ करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. एआयसीटीई’च्या (ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन) निर्देशांचे पालन करत विद्यापीठाने अभ्यासक्रमाला नवीन रुप देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली होती. वर्षानुवर्षे असलेला रटाळपणा दूर करत ‘अ‍ॅक्टिव्हिटी’ आधारित अभ्यासक्रम तयार झाला आहे. प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला बुधवारपासूनच सुरुवात झाली असून नवीन सत्रापासूनच नवीन अभ्यासक्रम लागू करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न राहणार आहे.

देशभरात गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रणाली लागू करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने पुढाकार घेतला. याअंतर्गतच ‘एआयसीटीई’ने पदवी, पदव्युत्तर अभियांत्रिकी व तांत्रिकी अभ्यासक्रम ‘अपडेट’ करणे आणि नवीन अभ्यासक्रम तयार करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार नागपूर विद्यापीठाने २०१८ साली अभ्यासक्रमात बदल करण्यासंदर्भात पावले उचलली होती. यासंदर्भात प्राचार्यांची समितीदेखील नेमण्यात आली होती. मध्यंतरीच्या कालावधीत ही प्रक्रिया काहीशी थंडावली होती. मात्र विद्यापीठात सत्ताबदल झाल्यानंतर परत अभ्यासक्रम ‘अपडेट’ करण्यासंदर्भात पावले उचलण्यात आली.

नवीन अभ्यासक्रम आता अंतिम टप्प्यात आला आहे. अभ्यासक्रमात उद्योगक्षेत्राची आवश्यकता व विद्यार्थ्यांना कौशल्याधिष्ठित करणे या दिशेने बदल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ‘अ‍ॅक्टिव्हिटी’ आधारित अभ्यासक्रम राहणार आहे. यामुळे विद्यार्थी जास्तीत जास्त प्रकारे प्रत्यक्ष सहभागी होऊ शकतील व प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून त्यांना पुस्तकातील मुद्देदेखील स्पष्टपणे कळतील. या अभ्यासक्रमामुळे शिक्षण क्षेत्र व उद्योग क्षेत्र यांच्यातील ‘लिंकेज’देखील वाढण्यास मदत होईल, असा विश्वास कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी व्यक्त केला.

बदलाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

कोरोनामुळे यंदा अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया लांबली. बुधवारपासूनच प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली व सर्वसाधारणत: जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून प्रथम वर्षाचे वर्ग सुरू होतील, अशी अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर यंदा नवीन अभ्यासक्रम लागू होणार की नाही याबाबत अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये संभ्रम कायम आहे. यासंदर्भात विज्ञान व अभियांत्रिकी विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.राजेश शिंगरू यांना संपर्क केला असता त्यांनी नवीन अभ्यासक्रम जवळपास तयार झाला असल्याची माहिती दिली. बदलासंदर्भात विद्यापीठाने वेगाने पावले उचलली असून यावर्षीच्या सत्रापासूनच अभ्यासक्रम लागू करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे कुलगुरूंनी सांगितले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र