कॅटरर्ससह तिघांवर गुन्हे कुणालाही अटक नाही

By Admin | Updated: December 4, 2015 03:16 IST2015-12-04T03:16:56+5:302015-12-04T03:16:56+5:30

अमरावती मार्गावरील मराठा लॉनमध्ये बुधवारी रात्री झालेल्या कॉफी मशीन स्फोट प्रकरणात अंबाझरी पोलिसांनी कॅटरर्ससह तीन जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले.

There were no arrests in the crime against the three cats | कॅटरर्ससह तिघांवर गुन्हे कुणालाही अटक नाही

कॅटरर्ससह तिघांवर गुन्हे कुणालाही अटक नाही

कॉफी मशीनचा स्फोट
नागपूर : अमरावती मार्गावरील मराठा लॉनमध्ये बुधवारी रात्री झालेल्या कॉफी मशीन स्फोट प्रकरणात अंबाझरी पोलिसांनी कॅटरर्ससह तीन जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. ब्रिजेश रामरूप मिश्रा (वय ३३, रा. न्यू कैलासनगर), फारुख शेख इस्माईल (वय २१, रा. पार्वतीनगर अजनी) आणि देवेंद्र लक्ष्मण परिहार (वय २३, रा. अजनी) अशी आरोपींची नावे आहेत.
मराठा लॉनमध्ये बुधवारी रात्री ८.३० ला सुरू असलेल्या लग्न समारंभात अचानक कॉफी मशीनचा स्फोट झाला. त्यामुळे किरण अरुण तारेकर (वय ५२, रा. तुळशीबाग, राणी इंदिराबाई भोसले विहार, महाल), त्यांची मुलगी श्रद्धा (वय १९) आणि पुतणी श्रावणी कल्पेश तारेकर (वय १०) या तिघांना जबर दुखापत झाली. श्रावणीच्या डाव्या हाताच्या पंजासह पोटालाही जबर जखमा झाल्या तर, अन्य चार ते पाच जणांना जखमा झाल्या.
या स्फोटामुळे लग्न समारंभाचे आनंदाचे वातावरण बदलले. तेथे रडारड, धावपळ सुरू झाली. बराच वेळपर्यंत स्फोटाचे कारण लक्षात आले नाही. त्यामुळे उलटसुलट चर्चेलाही उधाण आले. दरम्यान, माहिती कळताच अंबाझरी पोलीस, गुन्हेशाखेचे पथक, बीडीडीएसही पोहचले. जखमींना रुग्णालयात हलविल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून कॉफी मशीन आणि अन्य काही चिजवस्तू जप्त केल्या. त्यानंतर अंबाझरी ठाण्यात मिश्रा, फारुख आणि परिहारविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.

Web Title: There were no arrests in the crime against the three cats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.