अर्ध्या शहरात शुक्रवारी पाणी पुरवठा नाही

By Admin | Updated: April 9, 2015 02:56 IST2015-04-09T02:56:40+5:302015-04-09T02:56:40+5:30

वाढत्या तापमानासह जलसंकटाचे सत्रही सुरू झाले आहे. येत्या शुक्रवारी अर्ध्यापेक्षा अधिक शहरातील पाणी पुरवठा प्रभावित होण्याची शक्यता आहे.

There is no water supply in the half-city Friday | अर्ध्या शहरात शुक्रवारी पाणी पुरवठा नाही

अर्ध्या शहरात शुक्रवारी पाणी पुरवठा नाही

नागपूर : वाढत्या तापमानासह जलसंकटाचे सत्रही सुरू झाले आहे. येत्या शुक्रवारी अर्ध्यापेक्षा अधिक शहरातील पाणी पुरवठा प्रभावित होण्याची शक्यता आहे. कारण पाण्याची पाईपलाईन जोडणे आणि बटर फ्लॉय व्हॉल्व बसविण्यासाठी २४ तासाचा शटडाऊन घोषित करण्यात आला अहे.
त्यामुळे काही झोनमधील वस्त्यांचा पाणीपुरवठा प्रभावित होणार असल्याचे ओसीडब्ल्यूने सुद्धा जाहीर केले आहे. यामध्ये धंतोली, हनुमाननगर, मंगळवारी, गांधीबाग, सतरंजीपुरा आणि धरमपेठ झोनच्या काही भागाचा समावेश आहे.
पाणीपुरवठा बाधित वस्त्या
ओंकारनगर, बाभुळखेडा, जोगीनगर, रमानगर, जयवंतनगर, सेवादलनगर, शिवशक्तीनगर, आकाशनगर, शेषनगर, अमरनगर, जानकीनगर, श्री कॉलनी, भोलेबाबानगर, विठ्ठलनगर, कुकडे-ले-आऊट, रामेश्वरी, वंजारीनगर, जुना सुभेदार लेआऊट, वेळेकरनगर, रघुजीनगर, हनुमाननगर, चंदननगर, वकीलपेठ, रेशीमबाग, आनंदनगर, आझमशहा ले-आऊट, रामबाग, गुजरवाडी, म्हाडा कॉलनी, गणेशपेठ, रामवाडी, कर्नलबाग, गाडीखाना, सदर, छावणी, रामदासपेठ, यशवंत स्टेडियम, छोटी धंतोली, बर्डी, रेल्वे स्टेश्न, मोहननगर, व बोरियापुरा

Web Title: There is no water supply in the half-city Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.