शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘सावजी’मध्ये मद्यविक्रीच्या परवानगीचा कुठलाही निर्णय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 22:54 IST

राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत सावजी हॉटेल्समध्ये मद्यविक्रीची परवानगी देण्यासंदर्भात राज्य शासनाने कुठलाही निर्णय घेतलेला नसल्याचे राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात पसरविण्यात येणारी माहिती व वृत्त म्हणजे अफवाच असून यावर कुणीही विश्वास ठेवू नये, असेदेखील त्यांनी सांगितले आहे.

ठळक मुद्देउत्पादन शुल्क मंत्र्यांची स्पष्टोक्ती : नियमबाह्य परवाने रद्द करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत सावजी हॉटेल्समध्ये मद्यविक्रीची परवानगी देण्यासंदर्भात राज्य शासनाने कुठलाही निर्णय घेतलेला नसल्याचे राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात पसरविण्यात येणारी माहिती व वृत्त म्हणजे अफवाच असून यावर कुणीही विश्वास ठेवू नये, असेदेखील त्यांनी सांगितले आहे.नागपूर जिल्ह्यातील खाद्यसंस्कृतीचा एक अविभाज्य भाग असणाऱ्या सावजी हॉटेल्समध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे मद्यविक्रीची परवानगी देण्यात येणार आहे, अशा आशयाचा दावा काही अधिकारी तसेच प्रसारमाध्यमांनी केला होता. यासंदर्भात शुक्रवारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना शासनाची भूमिका मांडली. मद्यविक्रीसाठी साधारणत: रेस्टॉरेन्ट्सला ‘एफएल-३’ हा परवाना देण्यात येतो. मात्र त्यासाठीदेखील पोलीस, मनपा, अन्न व औषधी प्रशासन विभागासोबत विविध विभागांच्या परवानग्या लागतात. शिवाय अंतिम निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेली समिती निर्णय घेते. जर सर्व काही नियमाप्रमाणे असेल तरच रेस्टॉरेन्टला हा परवाना मिळतो. नागपूर जिल्ह्यातील ९० टक्क्यांहून अधिक सावजी हॉटेल्स या नियमांत बसतच नाहीत. अशा प्रकारचा परवाना देण्याचा पहिला अधिकार हा जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील समितीला आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले.सावजी असोसिएशनच्या कुठल्याही पदाधिकाºयाने माझी भेट घेतलेली नाही. राज्य शासनाने सरसकट सावजीला परवाना देण्याचा निर्णय घेतलेला नाही. यासंदर्भात कुणी खोडसाळपणा केला असेल तर याबाबत चौकशी करू, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.‘त्या’ परवान्यांबाबत चौकशी करूनागपूर शहरातील चार सावजी हॉटेल्सला मद्यविक्रीचा परवाना मिळाला असल्याचा दावा उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रमोद सोनोने यांनी केला होता. यासंदर्भात बावनकुळे यांना विचारणा केली असता मद्यविक्रीचा परवाना रेस्टॉरेन्टला देण्याचा निर्णय जिल्हाधिकाºयांची समिती घेते. मात्र जर सावजी हॉटेलला असा परवाना मिळाला असेल व तो नियमबाह्य असेल तर तो रद्द करण्याचा शासनाला अधिकार आहे. यासंदर्भात चौकशी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :liquor banदारूबंदीnagpurनागपूरhotelहॉटेल