शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
2
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
3
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
4
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
5
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
6
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
7
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
8
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
9
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
10
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
11
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
12
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
13
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
14
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
15
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
16
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
17
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
18
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

मनपा अर्थसंकल्पात उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 11:50 PM

मागील अनेक वर्षापासून सुरू असलेली वाढीव रकमेचा अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी यंदाही कायम ठेवली. गेल्या वर्षीच्या तुलनेत २५१ कोटी अधिक रकमेचा ३१९७.६० कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. यात मागील चार-पाच वर्षातील अर्थसंकल्पात असलेल्या योजनांचा समावेश असल्याने या घोषणा अमलात येणार की कागदावरच राहणार प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे.

ठळक मुद्देघोषणा कागदावरच; वर्षानुवर्षे प्रकल्प प्रलंबित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील अनेक वर्षापासून सुरू असलेली वाढीव रकमेचा अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी यंदाही कायम ठेवली. गेल्या वर्षीच्या तुलनेत २५१ कोटी अधिक रकमेचा ३१९७.६० कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. यात मागील चार-पाच वर्षातील अर्थसंकल्पात असलेल्या योजनांचा समावेश असल्याने या घोषणा अमलात येणार की कागदावरच राहणार प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे.अर्थसंकल्पातील ६० टक्के घोषणांची अंमलबजावणी होत नाही. महाल परिसरातील श्रीमंत राजे रघुजीराव भोसले, नगरभवन टाऊन हॉल बांधकामासाठी दरवर्षीच्या अर्थसंकल्पात तरतूद केली जाते. परंतु अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. वर्ष २०१५-१६ मध्ये तत्कालीन स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी अर्थसंकल्पात समावेश केला होता. वर्ष २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष बंडू राऊ त यांनी या कामासाठी ५ कोटींची तरतूद केली होती. त्यानंतर २०१७-१८ व वर्ष २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात प्रत्येकी १० कोटींची तरतूद करण्यात आली होती. वर्ष २०१९-२० च्या अर्थसंकल्पात विद्यमान अध्यक्ष पोहाणे यांनी सुद्धा १० कोटींची तरतूद केली आहे. म्हणजेच गेल्या पाच वर्षात या प्रकल्पाला सुरुवात झालेली नाही.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दी स्मारकासाठी दरवर्षीच्या अर्थसंकल्पात तरतूद केली जाते. परंतु हा निधी खर्च होत नाही. वर्ष २०१५-१६ मध्ये या प्रकल्पासाठी दोन कोटींची तरतूद केली होती. यंदाही या प्रकल्पासाठी दोन कोटींची तरतूद करण्यात आली. दरवर्षीच्या अर्थसंकल्पातील हा निधी अखर्चित असतो. बाळासाहेब ठाकरे स्मृती शैक्षणिक कला, क्रीडा व सांस्कृतिक केंद्रासाठी वर्ष २०१५ पासून अर्थसंकल्पात तरतूद केली जाते. ही परंपरा यंदाही कायम ठेवली असून यासाठी दोन कोटीची तरतूद करण्यात आली आहे.वर्दळीच्या व बाजार भागात शौचालयांची सुविधा नसल्याने महिलांची कुचंबणा होते. त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. याचा विचार करता महिलांसाठी विशेष शौचालये उभारण्याची गरज आहे. गेल्या पाच वर्षापूर्वी महिलांसाठी शौचालये उभारण्यासाठी शहरातील ५० स्थळांची निवड करण्यात आली होती. जेमतेम १५ शौचालयांची निर्मिती करण्यात आली. यंदाही अर्थसंकल्पात तरतूद आहे. परंतु शौचालयाचा प्रश्न अजूनही मार्गी लागलेला नाही.अभिन्यासाचा विकास कधी होणार५७२ व १९०० अभिन्यासातील (ले-आऊ ट)मधील विविध विकास कामांसाठी दरवर्षीच्या अर्थसंकल्पात तरतूद केली जाते. परंतु त्या प्रमाणात निधी खर्च केला जात नाही. गेल्या पाच वर्षात जवळपास १०० कोटींची तरतूद करण्यात आली. मात्र अजूनही या भागात रस्ते, सिवरेज व पाणीपुरवठ्याची समस्या कायम आहे.२०१५-१६ या वर्षात ३० कोटी, २०१६-१७ मध्ये २५ कोटी, २०१७-१८ मध्ये २० कोटी, २०१८-१९ या वर्षात २० कोटी तर २०१९-२० या वर्षात २५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान ५७२ व १९०० अभिन्यासाच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेणार असल्याचे संकेत विरोधकांनी दिले आहे.तलाव संवर्धनाची प्रतीक्षाचशहरात १३ तलाव आहेत. तलावांचे संवर्धन झाले तर टंचाईच्या काळात मोठा दिलासा मिळू शकतो. तलाव पुनर्जीवन प्रकल्प राबविण्यासाठी अर्थसंक ल्पात तरतूद केली जाते. सोनेगाव व गांधीसागर तलावांच्या संवर्धनासाठी राज्य शासनाने २९.३२ कोटींचा निधी उपलब्ध केला. पांढराबोडी तलाव संवर्धनाला शासनाची मंजुरी आहे. नाईक तलावाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. अंबाझरी व फुटाळा तलावांचे प्रस्ताव राष्ट्रीय सरोवर संवर्धन विभागाला पाठविले आहेत. दुसरीकडे दरवर्षीच्या अर्थसंकल्पात तलाव संवर्धनासाठी तरतूद क रूनही तलावांची दुर्दशा संपलेली नाही. नंदग्रामचा प्रश्नही गेल्या काही वर्षापासून प्रलंबित आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBudget 2019अर्थसंकल्प 2019