शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्याच्या सात तालुक्यात एकही पीक विम्याचा लाभार्थी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 20:13 IST

लोकमत न्यूज  नेटवर्कनागपूर : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विम्याचा लाभ देण्यात येतो. २०१७-१८ मध्ये जिल्ह्यात ३५ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. यातून १४४७ शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्यात आला. मात्र यात सात तालुक्यातील एकाही शेतकऱ्याचा समावेश नाही. एक विशेष म्हणजे उमरेड तालुक्यात केवळ एक शेतकरी पीक विम्याचा लाभार्थी ठरला. ...

ठळक मुद्देउमरेडमध्ये मिळाला केवळ एका शेतकऱ्याला लाभ : ३६ हजार शेतकऱ्यांनी काढला होता विमा

लोकमत न्यूज  नेटवर्कनागपूर : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विम्याचा लाभ देण्यात येतो. २०१७-१८ मध्ये जिल्ह्यात ३५ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. यातून १४४७ शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्यात आला. मात्र यात सात तालुक्यातील एकाही शेतकऱ्याचा समावेश नाही. एक विशेष म्हणजे उमरेड तालुक्यात केवळ एक शेतकरी पीक विम्याचा लाभार्थी ठरला. जिल्ह्यात सर्वत्र सारखेच नुकसान झाले असताना, सात तालुक्यातील शेतकरी वंचित का? असा सवाल जि.प.च्या सदस्यांनी उपस्थित केला आहे.शेती निसगार्शी संबंधित आहे. अतिवृष्टी, चक्रिवादळ, कमी पाऊस, कीड यामुळे शेतपिकाचे मोठे नुकसान होते. त्याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांवर बसतो. नैसर्गिक आपदेमुळे होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना रिलिफ मिळावा म्हणून शासनाने पीक विमा योजना सुरू केली. बँकेतून कर्ज काढणाऱ्या शेतकऱ्यासाठी ही पीक विमा सक्तीची आहे. गेल्या आठ-दहा वर्षात या योजनेमुळे शेतकऱ्यांपेक्षा विमा कंपन्यांनाच फायदा जास्त झाला. त्यामुळे शेतकऱ्यांकडून पीक विमा योजना फसवी असल्याचा आरोप होत होता. २०१७ च्या खरीप हंगामात नागपूर जिल्ह्यात ३६ हजार २१८ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. विम्यापोटी त्यांनी ४ कोटी ९३ लाख ४७ हजार ४७२ रुपये भरले. खरीप हंगामात बोंडअळी आणि तुडतुड्यामुळे कापूस आणि धान पिकाचे मोठे नुकसान झाले. विमा कंपनीमार्फत फक्त १४४७ शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे उमरेड तालुक्यात फक्त एकाच शेतकऱ्यास लाभ देण्यात आला. लाभ देताना महसूल मंडळाचा विचार करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे संपूर्ण महसूल मंडळाच एकच शेतकऱ्याचे नुकसान कसे झाले, असाच सवाल उपस्थित होत आहे. तालुकापात्र शेतकरी संख्यारामटेक ६९४कळमेश्वर ५६७नरखेड १७२उमरेड १काटोल १३ कंपन्यांचे पोट भरण्यासाठी योजनामुळात पीक विम्याचा प्रकारच विचित्र आहे. ज्या विमा कंपन्या आहे त्या जबाबदारीच घेत नाही. कंपन्या आपल्या मनाने योजना राबविते. विशेष म्हणजे नुकसानीचा स्थानिक अधिकाऱ्यांनी पंचनामा केल्यानंतर शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळायला पाहिजे. परंतु विमा कंपन्या स्थानिक अधिकाऱ्यांचा अहवाल ग्राह्य धरत नाही. ही योजना केवळ कंपन्यांचे पोट भरण्यासाठी आहे. शासनाचा यावर कुठलाही अंकुश नाही.श्रीधर ठाकरे, कृषितज्ज्ञ

टॅग्स :Farmerशेतकरीnagpurनागपूर