शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

दरवर्षी देशात ३० लाख युनिट रक्ताचा तुटवडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 12:55 IST

डॉ. सुनील खापर्डे : आज जागतिक रक्तदाता दिन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात दरवर्षी सुमारे १.२ कोटी युनिट रक्ताची गरज असते. पण, केवळ ९० लाख युनिट रक्त संकलित होते. त्यामुळे ३० लाख युनिटचा तुटवडा कायम राहतो. परिणामी, पैसे घेऊन रक्तदान करणाऱ्या व्यावसायिक रक्तदात्यांवर रुग्णांना अवलंबून राहावे लागते, ही चिंतेची बाब आहे, असे मत रक्त सुरक्षेचे राष्ट्रीय तज्ज्ञ आणि नॅकोचे माजी संचालक डॉ. सुनील खापर्डे यांनी मांडले.

जागतिक रक्तदाता दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, 'रक्तकोश'सारख्या उपक्रमांमुळे काही सुधारणा झाल्या असल्या, तरी राष्ट्रीय रक्तसंकलन यंत्रणा नसल्यामुळे भारतात एकसंध आणि समन्वयित प्रणाली तयार होत नाही. आजही ५० टक्क्यांपेक्षा कमी रक्तदान हे खऱ्या अर्थाने स्वयंस्फूर्त आहे. उरलेले रक्तदान हे व्यावसायिक किंवा नातेवाइकांमार्फतच होते. 

नो शॉर्टेज, नो वेस्टेज' धोरण जाहीरजागतिक रक्तदातादिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी राज्यात 'नो शॉर्टेज, नो वेस्टेज' धोरण तत्काळ तयार करून अमलात आणण्याचे आदेश दिले आहेत; जेणेकरून गरजू रुग्णांना योग्य वेळी सुरक्षित रक्त मिळेल आणि नियोजनाअभावी रक्त वाया जाण्याचे प्रमाणही कमी होईल. ते म्हणाले की, स्वातंत्र्यदिवस, प्रजासत्ताक दिन किंवा राजकीय नेत्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर रक्तदान होते. पण सण, उन्हाळा आणि परीक्षा कालावधीत रक्तदान शिबिरांचे प्रमाण कमी असते, त्यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवतो. 

स्वयंस्फूर्त रक्तदानामुळे सामाजिक भान वाढतेलाइफलाइन ब्लड बँकेचे संचालक डॉ. हरीश वरभे यांनी सांगितले, स्वयंस्फूर्त रक्तदान केवळ इतरांचे प्राण वाचवत नाही, तर स्वतः रक्तदात्याच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. रक्तदानामुळे मेंदूतील बोन मॅरोला नवीन आणि ताजे रक्त पेशी तयार करण्यास चालना मिळते. शरीरातील लोहाचे प्रमाण संतुलित राहते आणि सामाजिक भान वाढते.

 

टॅग्स :nagpurनागपूर