शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ध्रुवीकरणासाठी दंगली घडविण्याचा कट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 23:52 IST

आरएसएसच्या प्रभावाखाली राज्य व केंद्रातील भाजपा सरकार जातीय देशातील सलोखा बिघडवत आहे. देशात त्यामुळेच जातीय दंगली होत आहेत. महाराष्ट्रातही हा प्रकार सुरू आहे. कोरेगाव-भीमा व जळगावचे उदाहरण ताजे आहे. खऱ्या गुन्हेगारांना पाठीशी घालून निरपराध्यांना लक्ष्य केले जात आहे. जातीय दंगली या सरकारपुरस्कृत आहेत व येत्या निवडणुका लक्षात घेता ध्रुवीकरण करण्यासाठी पुन्हा दंगली घडविण्याचे कारस्थान रचले जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे प्रदेश अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे यांनी केला.

ठळक मुद्देकाँग्रेसचे राजू वाघमारे यांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आरएसएसच्या प्रभावाखाली राज्य व केंद्रातील भाजपा सरकार जातीय देशातील सलोखा बिघडवत आहे. देशात त्यामुळेच जातीय दंगली होत आहेत. महाराष्ट्रातही हा प्रकार सुरू आहे. कोरेगाव-भीमा व जळगावचे उदाहरण ताजे आहे. खऱ्या गुन्हेगारांना पाठीशी घालून निरपराध्यांना लक्ष्य केले जात आहे. जातीय दंगली या सरकारपुरस्कृत आहेत व येत्या निवडणुका लक्षात घेता ध्रुवीकरण करण्यासाठी पुन्हा दंगली घडविण्याचे कारस्थान रचले जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे प्रदेश अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे यांनी केला.डॉ. वाघमारे शनिवारी नागपुरात आले होते़ पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, सरकार घोषणेत आॅनलाईन असले तरी कामात आॅफलाईन असून, त्यांचा कारभार पूर्णपणे हँग झाला आहे. कर्जमाफी योजनेचा गवगवा केला गेला़ मात्र या योजनेचा पुरता बोजवारा उडाला़ अद्याप खरीपाचे कर्जही शेतकऱ्यांना मिळालेले नाही़ केवळ १० टक्के कर्जवाटप झाले आहे़ राज्यातील जातीय सलोखा बिघडत आहे़ सरकारपुरस्कृत दंगलीमुळे राज्य होरपळून निघाले आहे़ कोरगाव-भीमा प्रकरणातील आरोपी असलेल्या संभाजी भिडेंना पाठीशी घालून सरकार जे पीडित आहेत त्यांना लक्ष्य करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. भिडेंना क्लीन चिट देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी गृहखात्याच्या कोणत्या विभागाद्वारे चौकशी केली, हे जाहीर करावे, असे आव्हान त्यांनी दिले. जळगाव जिल्ह्यातील घटनाही अशीच हाताळली जात असून, गुन्हेगारांऐवजी तेथील पीडित कुटुंबच दहशतीखाली असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात गुन्हेगारी कमी होण्याऐवजी वाढली आहे़ कायदा सुव्यवस्थेची पुरती दैना झाली आहे़ असे असतानाही मु्ख्यमंत्री गृहमंत्रिपद सोडायला तयार नसल्याची टीका त्यांनी केली. शेतकरी पत्रपरिषदेला प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, काँग्रेस नेते दिनेश बानाबाकोडे, संदीप सहारे, संजय मेश्राम, रमण पैगवार, अनिल नगरारे, जयंत लुटे आदी उपस्थित होते़.

टॅग्स :congressकाँग्रेसnagpurनागपूर