शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

Corona Virus in Nagpur; ‘कोरोना’मुळे संघाचे शिक्षा वर्ग नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2020 12:22 PM

‘कोरोना’मुळे आलेले राष्ट्रीय संकट लक्षात घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशभरातील सर्व संघ शिक्षा वर्ग रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिल ते जून या कालावधीतीत सर्व वर्ग रद्द करण्यात आले असल्याची माहिती सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’मुळे आलेले राष्ट्रीय संकट लक्षात घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशभरातील सर्व संघ शिक्षा वर्ग रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिल ते जून या कालावधीतीत सर्व वर्ग रद्द करण्यात आले असल्याची माहिती सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी दिली आहे.संघाच्या वेळापत्रकानुसार दरवर्षी उन्हाळ्याच्या कालावधीत देशभरात विविध वर्गांचे आयोजन करण्यात येते. यात प्राथमिक, प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष वर्गांचा समावेश असतो. तृतीय वर्ष वर्ग हा देशपातळीवरचा असतो व त्यात देशभरातील स्वयंसेवक सहभागी होत असतात. हे आयोजन केवळ नागपूरलाच होते. विशेष म्हणजे या वर्गांचे वेळापत्रक अगोदरपासूनच ठरलेले असते व त्याचे नियोजनदेखील मार्चपासूनच सुरू होते. ‘कोरोना’चे संकट असल्यामुळे संघ स्वयंसेवक सेवाकार्यात लागले आहेत. शिवाय एका जागी पाचहून अधिक लोक जमता येत नाहीत. देशात ‘लॉकडाऊन’ आहे व ‘कोरोना’वर नियंत्रण कधी येईल हे निश्चित सांगता येत नाही. अशा स्थितीत संघ शिक्षा वर्ग रद्द करण्याचाच निर्णय संघधुरिणांनी घेतला आहे.एप्रिल ते जूनपर्यंतच्या वर्गांसोबतच या कालावधीत आयोजित सर्व सार्वजनिक व सामूहिक कार्यक्रमदेखील रद्द करण्यात आले असल्याचे डॉ. मनमोहन वैद्य यांनी स्पष्ट केले आहे.मागील वर्षी निवडणुकांमुळे लांबला होता वर्गसंघात तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्ग महत्त्वाचा मानला जातो. देशभरातील विविध प्रांतांमधील स्वयंसेवक यात सहभागी होत असतात. दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात याची नागपुरात सुरुवात होते. मागील वर्षी लोकसभा निवडणुका असल्यामुळे तो वर्ग उशिरा सुरू झाला होता. दरम्यान, संघाची स्थापना १९२५ साली झाली. त्यानंतर संघावर बंदी आल्यानंतरचे वर्ष सोडून दरवर्षीच संघ शिक्षा वर्गांचे आयोजन होत आले आहे. यंदा मात्र ‘कोरोना’चा फटका बसल्याचे चित्र आहे. 

 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस