नागपूर : अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या १०४ भारतीयांना बुधवारी डिपोर्ट करण्यात आले व त्यांना घेऊन अमेरिकन लष्करी विमान अमृतसरमध्ये उतरले. यावरून बाहेरील देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या किंवा गुन्हे केल्यामुळे तुरुंगात गेलेल्या भारतीय नागरिकांचा मुद्दा चर्चेत आला आहे. सद्यस्थितीत भारतातील १६९ नागरिक अमेरिकेतील तुरुंगात विविध गुन्ह्यांखाली कैद आहेत. तर जगातील एकूण ८६ देशांमधील हाच आकडा १० हजारांहून अधिक आहे. यातील कतारसारख्या काही देशांसोबत भारताचे हस्तांतरण करार नसल्यामुळे तेथील कैदी परतणार कसे असा सवाल उपस्थित होत आहे.
परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार जगातील ८६ देशांमध्ये १० हजार १५२ कैदी तेथील तुरुंगांमध्ये आहेत. काही बेकायदेशीर निवास तर अनेक जण विविध गुन्ह्यांमध्ये अडकल्याने तुरुंगात आहेत. नेपाळमध्ये सर्वाधिक १ हजार ३१७ भारतीय तुरुंगात आहेत. याशिवाय प्रामुख्याने सौदी अरेबिया (२,६३३), संयुक्त अरब अमिरात (२,५१८) यांच्यासह बहरीन, चीन, इटली, कुवैत, मलेशिया, ओमान, कतार, युनायटेड किंगडम या देशांचा समावेश आहे. या देशांमध्ये १०० किंवा त्याहून अधिक भारतीय कैद आहेत.
पाकिस्तान, चीनमध्ये सव्वाचारशेवर भारतीय भारताशी तणावाचे संबंध असलेल्या पाकिस्तान व चीनमध्ये सव्वाचारशेहून अधिक भारतीय तुरुंगात आहेत. पाकिस्तानमध्ये २६६ तर चीनमध्ये १७३ भारतीय तुरुंगात खितपत पडले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे बांगलादेशने केवळ चार भारतीय कैदी असल्याचा दावा केला आहे. ही अधिकृत आकडेवारी असली तरी प्रत्यक्षात याहून कैद्यांचे प्रमाण जास्त असण्याची शक्यता आहे.
बहुतांश कैदी अंडरट्रायल, गल्फमधील कैद्यांचे काय?या सर्व देशांमधील बहुतांश भारतीय कैदी हे अंडरट्रायल आहेत. काही देशांमधील कठोर कायद्यांमुळे कैद्यांच्या परवानगीशिवाय तेथील प्रशासनाकडून अधिकृत आकडादेखील जारी करण्यात येत नाही. भारताने अनेक राष्ट्रांसोबत कैदी हस्तांतरण करार केले आहेत. त्यामुळे गुन्ह्यात दोषी ठरलेल्या व्यक्तीला तुरुंगात शिक्षा भोगण्यासाठी त्याच्या किंवा तिच्या मायदेशी स्थानांतरित करण्याची परवानगी मिळते. गल्फ व ज्या देशांसोबत भारताचा सामंजस्य करार नाही अशा ठिकाणी कैद्यांना कायदेशीर मदत पोहोचविण्यात अडचणी येतात.
वकिलांच्या स्थानिक पॅनल्सची मदतभारतीय नागरिकांना तुरुंगात टाकल्यावर परराष्ट्र मंत्रालयाकडून तातडीने पावले उचलण्यात येतात व लवकरात लवकर कायदेशीर मदत पोहोचविण्यावर भर देण्यात येतो. यासाठी वकिलांच्या स्थानिक पॅनल्सचीदेखील मदत घेण्यात येते. भारतीय दूतावासाकडून या सुविधांसाठी कुठलेही शुल्कदेखील घेण्यात येत नाही. भारतीय समुदाय कल्याण निधीअंतर्गत ही मदत करण्यात येते.
प्रमुख देशांमधील भारतीय कैदीदेश : कैदीअफगाणिस्तान : ८ऑस्ट्रेलिया : २७बहरीन : १८१भूतान : ६९कॅनडा : २३चीन : १७३फ्रान्स : ४५जर्मनी : २५इराण : १८इटली : १६८कुवैत : ३८७मलेशिया : ३३८नेपाळ : १,३१७ओमान : १४८पाकिस्तान : २६६कतार : ६११रशिया : २७सौदी अरेबिया : २,६३३सिंगापूर : ९२श्रीलंका : ९८यूएई :२,५१८युके : २८८