...तर वाघाेबाचे दर्शन महागात पडेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:09 IST2021-09-23T04:09:16+5:302021-09-23T04:09:16+5:30

नागपूर : इंधन महागाईचा फटका सर्वच क्षेत्रावर पडत आहे. आता जंगल सफारीचा आनंदही महागात पडण्याची शक्यता आहे. पेट्राेल, डिझेल ...

... then the sight of a tiger will be expensive | ...तर वाघाेबाचे दर्शन महागात पडेल

...तर वाघाेबाचे दर्शन महागात पडेल

नागपूर : इंधन महागाईचा फटका सर्वच क्षेत्रावर पडत आहे. आता जंगल सफारीचा आनंदही महागात पडण्याची शक्यता आहे. पेट्राेल, डिझेल दरवाढीने त्रस्त जिप्सीचालकांनी भाडेवाडीचे निवेदन वन विभागाला दिले आहे. ही मागणी मंजूर झाली तर पेंच किंवा ताडाेबात गेल्यानंतर वाघाेबांचे दर्शनही महागात पडेल, अशी शक्यता आहे.

मध्य प्रदेशातील कान्हा केसरी व्याघ्र प्रकल्पात जिप्सीच्या दरात वाढ करण्याच्या प्रस्तावाला वन विभागाने मान्यता दिली आहे. यामुळे तेथील सफारीचे दर २५०० वरून ३००० रुपयावर गेले आहेत. त्यानुसार पेंच व्याघ्र प्रकल्पातील जिप्सी चालक-मालक असाेसिएशननेही भाडेवाढ करण्याची मागणी वन विभागाला केली आहे. संघटनेच्या महेंद्र वर्मा यांनी सांगितले, २०१८ पासून पेट्राेलच्या दरात तब्बल २५ टक्के वाढ झाली आहे. ७६ रुपये असलेले पेट्राेलचे दर १०० रुपयाच्या वर पाेहचले आहेत. याशिवाय वाहन विम्याच्या दरातही जवळपास ५० टक्के वाढ झाली आहे. तीन वर्षांत वाहन संचालनाच्या खर्चात २५ टक्के वाढ झाली आहे आणि महागाईचे प्रमाण १०-१५ टक्क्यांनी वाढले आहे. अशावेळी भाड्यातही वाढ करण्याची मागणी संघटनेने केली आहे. सध्या पेंच प्रकल्पात जिप्सी चालकांचे भाडे २००० रुपये आहे. संघटनेने हे भाडे २८०० रुपये करण्याची मागणी केली हाेती. किमान २५०० रुपये तरी व्हावे, अशी अपेक्षा संघटनेतर्फे वर्मा यांनी व्यक्त केली आहे. ताडाेबामधील जिप्सीचालकांनीही भाडेवाढ करण्याची मागणी केली आहे. उल्लेखनीय म्हणजे गाईडचे दर ३५० वरून ४५० रुपये करण्यात आले आहेत. त्यामुळे महागाईची वाढ लक्षात घेत जिप्सीचे भाडे वाढविण्याची मागणी वर्मा यांनी केली.

४५०० चे पॅकेज ५००० वर जाईल

सध्या पर्यटकांसाठी पेंच व्याघ्र प्रकल्पाचे शनिवार-रविवारचे पॅकेज ४३७० रुपये एवढे आहे. यामध्ये जंगल सफारीचे २००० रुपये, जिप्सीचे २००० रुपये, ३५० रुपये गाईड आणि कचरा गाेळा करण्यासाठी देण्यात येणाऱ्या पिशवीचे २० रुपये. जिप्सी चालकांची मागणी मान्य झाली तर यात ५०० रुपये जिप्सी व १०० रुपये गाईड असे ६०० रुपये वाढणार आहेत. साेमवार ते शुक्रवार यात जंगल सफारीच्या खर्चात १००० रुपये कमी हाेतात.

Web Title: ... then the sight of a tiger will be expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.