शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

...तर नागपुरात कर्फ्यूसह लॉकडाऊन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 21:14 IST

शहरात लॉकडाऊन होईल की नाही, याबाबत सर्वत्र संभ्रम असताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बुधवारी याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. नागरिक नियमांचे काटेकोर पालन करत नाहीत, शहरात वाढता कोरोना संसर्ग आणि मृत्यूची संख्या यावरून ते स्पष्ट होत आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास शहरात बाधितांचा आकडा हा १० हजारावर पोहचायला वेळ लागणार नाही. याचा विचार करता वेळ पडल्यास संचारबंदीसह लॉकडाऊन करण्यात येईल, असा इशारा आयुक्तांनी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात लॉकडाऊन होईल की नाही, याबाबत सर्वत्र संभ्रम असताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बुधवारी याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. नागरिक नियमांचे काटेकोर पालन करत नाहीत, शहरात वाढता कोरोना संसर्ग आणि मृत्यूची संख्या यावरून ते स्पष्ट होत आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास शहरात बाधितांचा आकडा हा १० हजारावर पोहचायला वेळ लागणार नाही. याचा विचार करता वेळ पडल्यास संचारबंदीसह लॉकडाऊन करण्यात येईल, असा इशारा आयुक्तांनी दिला.लॉकडाऊन करण्यापूर्वी २ ते ३ दिवस आधी याची माहिती दिली जाईल. लॉकडाऊन हा जवळपास १५ दिवसांचा असेल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. शहरातील कोरोनाची स्थिती आता नियंत्रणात आहे असे म्हणता येणार नाही. कारण, अनलॉकिंगनंतर कोरोना रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण वाढले आहे, ‘मिशन बिगीन अगेन’ ३ जूनला सुरू झाले. यानंतरची कोरोनाबाधित आणि मृत्यूसंख्या आणि यापूर्वीची बाधितांची आणि मृत्यूची संख्या यामध्ये मोठी तफावत आहे. ३ जूनपूर्वी फक्त ११ जणांचा मृत्यू झाला. ४०० च्या जवळपास पॉझिटिव्ह रुग्ण होते. आज शहरातील मरणाऱ्यांची संख्या ३७ झाली असून बाधितांचा आकडा २ हजार ३०० वर पोचला आहे. बाधितांचे प्रमाण पाच पटीने तर मरणाऱ्यांचे प्रमाण तीन पटीने वाढले आहे. नागरिक नियम पाळत नाहीत. आजाराची माहिती लपवतात, त्यामुळे मृत्यू वाढले. कुठेही नियम पाळले जात नसल्याचे चित्र आहे. परिणामी, वेळप्रसंगी आता केवळ लॉकडाऊनच नाही तर संचारबंदीदेखील लावण्यात येईल. अर्थात, नागरिकांना या दरम्यान बाहेर पडता येणार नाही, असेही ते म्हणाले.जे नागरिक आजारी आहेत, ज्यांना ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होतोय त्यांनी स्वत:हून तपासून घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.दोन तासात चार लाखांचा दंड वसूलनागरिक नियम पाळत नाहीत, त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढललेली आहे. नागरिकांनी नियम पाळावेत, शिस्त ठेवावी याकरिता रस्त्यावर उतरून कारवाई केली तेव्हा, केवळ दोन तासात चार लाखांचा दंड वसूल करण्यात आला. अशी विद्यमान परिस्थिती आहे. नियमांचे उल्लंघन होत आहे.- तर दहा हजाराहून अधिक रुग्ण होतीलनागपूर शहरात गेल्या काही दिवसात वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात न आल्यास रुग्णांची संख्या १० हजाराच्या पुढे जाईल, असा इशाराही तुकाराम मुंढे यांनी दिला.लॉकडाऊनची पूर्वसूचना दिली जाईललॉकडाऊनचे नियम दुकानदार,ऑटोरिक्षाचालक, दुचाकी, चारचाकी वाहनचालक आणि नागरिक पाळत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढत आहे. शहरासाठी असे वर्तन हानिकारक आहे. त्यामुळे प्रसंगी कडक संचारबंदीसह लॉकडाऊन करण्यात येईल. याबाबत दोन दिवसांपूर्वी माहिती दिली जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेnagpurनागपूरcorona virusकोरोना वायरस बातम्या