शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

-तर कोराडी औष्णिक वीज केंद्राची मंजुरी रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 20:59 IST

कोराडी औष्णिक वीज केंद्रातील युनिट क्रमांक ८, ९ आणि १० तर्फे पसरत असलेल्या प्रदूषणाबाबत केंद्रातील पर्यावरण मंत्रालयाने कडक भूमिका घेत महाजेनकोला नोटीस बजावली आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने पाठवली नोटीस  प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना न केल्याचा आरोप, १५ दिवसात आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोराडी औष्णिक वीज केंद्रातील युनिट क्रमांक ८, ९ आणि १० तर्फे पसरत असलेल्या प्रदूषणाबाबत केंद्रातील पर्यावरण मंत्रालयाने कडक भूमिका घेत महाजेनकोला नोटीस बजावली आहे. कोराडीतील या युनिटमुळे पसरत असलेले प्रदूषण रोखण्यासाठी सांगण्यात आलेल्या उपाययोजना करण्यात महाजेनको आतापर्यंत अपयशी ठरले आहे. त्यामुळे येत्या १५ दिवसात आवश्यक व्यवस्था लागू न झाल्यास कोराडी औष्णिक वीज केंद्राला मिळालेली मंजुरी रद्द केली जाऊ शकते, असे या नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयातर्फे महाजेनकोला २९ जानेवारी २०२० रोजी एक नोटीस पाठवण्यात आले. यात सांगण्यात आले आहे की, वर्ष २०१० मध्ये जेव्हा कोराडी औष्णिक वीज केंद्रातील युनिटसाठी पर्यावरण क्लिअरन्स देण्यात आले होते तेव्हा या युनिटमधून पसरणारे प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक एजीडी सिस्टीम लावण्याची अट ठेवण्यात आली होती. यानंतरही महाजेनको व सरकारने निष्काळजीपणा केला. मंत्रालयाने पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, या निष्काळजीपणामुळे पर्यावरण संरक्षण कायद्यातील कलम ५ अंतर्गत १५ दिवसात सर्व प्रकरणात उत्तर मागवण्यात आले आहे. यादरम्यान जर आवश्यक पाऊल उचलले नाही तर कोराडी वीज केंद्राची पर्यावरण संबंधित असलेली मंजुरी रद्द केली जाईल.काय आहे प्रकरण४ जानेवारी २०१० रोजी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने कोराडी औष्णिक वीज केंद्रातील युनिट क्रमांक ८, ९ आणि १० साठी ‘एनव्हायर्नमेंट क्लिअरन्स’ दिले होते. यात अशी अट ठेवण्यात आली होती की, वीज केंद्रातील या युनिटमधून पसरणारे प्रदूषण रोखण्यासाठी फ्यू गॅस डी- सल्फ्युरायजेशन (एफजीडी) सिस्टीम लावावी लागेल. युनिट नंबर ८ ने १६ डिसेंबर २०१५, युनिट नंबर ९ ने २२ नोव्हेंबर २०१६ आणि युनिट नंबर १० ने १७ जानेवारी २०१७ पासून काम करायला सुरुवात केली होती. त्यामुळे पर्यावरण क्लिअरन्सला मंत्रालयाकडून ३० जून २०१६ पर्यंत मुदत वाढवण्यात आली होती. परंतु आतापर्यंत वीज केंद्रात ही सिस्टीम लावण्यात आलेली नाही.

 निविदा निघाली, तरीही काम रखडले विशेष म्हणजे महाजेनकोतर्फे कोराडी पॉवर स्टेशनच्या तिन्ही युनिटच्या प्रदूषण नियंत्रणासाठी एफजीडी सिस्टीम लावणे आवश्यक होते. यासाठी निविदा प्रक्रियाही राबवण्यात आली होती. हिताची कंपनीचे प्रपोजल मिळाले होते. परंतु ही टेंडर प्रक्रियाच रद्द करण्यात आली होती. यानंतर पुन्हा निविदा काढण्यात आली. यावेळी केंद्र सरकारच्या ईआयपीएल कंपनीला कंत्राट देण्यात आले. परंतु आतापर्यंत महाजेनकोकडून कामाचे वितरणच करण्यात आलेले नाही. सूत्रानुसार चीनची वोहान नावाची कंपनी ईआयपीएल कंपनीची तांत्रिक सल्लागार आहे. चिनी कंपनीमुळे लेटलतिफी करण्यात आली. आता पर्यावरण मंत्रालयाने नोटीस जारी केल्याने कोराडी वीज केंद्रावर कारवाईची शक्यता बळावली आहे. 

टॅग्स :electricityवीजnagpurनागपूरenvironmentपर्यावरण