शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांची दिवाळी गोड व्हावी म्हणून 'त्यांचे' समर्पण; लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ५५० ट्रेन

By नरेश डोंगरे | Updated: November 13, 2023 22:38 IST

गाव-शहरात जाऊन सणोत्सव साजरा करण्यावर नागरिकांचा ओढा वाढला आहे.

नरेश डोंगरे 

नागपूर : ठिकठिकाणच्या नागरिकांना त्यांच्या आप्तस्वकियांमध्ये जाऊन दिवाळी साजरी करता यावी म्हणून रेल्वेचे हजारो कर्मचारी ऐन सणासुदीच्या दिवसांत कोणतीही सुटी न घेता रात्रंदिवस सेवा देत आहेत.

कोरोनाचा धोका टळल्यानंतर आलेल्या दिवाळीपासून आपापल्या गाव-शहरात जाऊन सणोत्सव साजरा करण्यावर नागरिकांचा ओढा वाढला आहे. त्यामुळे गेल्या दोन तीन वर्षांत सणोत्सवाच्या खास करून दिवाळीच्या सणाला देशाच्या प्रत्येकच भागात ईकडून तिकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड असते. परिणामी रेल्वे गाड्यांमध्ये झुंबड बघायला मिळते. ती लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने दोन वर्षांपासून विशेष नियोजन केले आहे. सणासुदीच्या काळात गेल्या वर्षी मध्य रेल्वेने २७० रेल्वेगाड्या चालविल्या होत्या. यंदा मात्र नियमित मेल, एक्सप्रेस व्यतिरिक्त ५०९ फेस्टीव्हल स्पेशल ट्रेन चालविल्या आहेत. त्यातून लक्ष्मीपूजनाच्या दिवशीपर्यंत ७ लाख, ५० हजार प्रवाशांची अतिरिक्त वाहतूक रेल्वेने केली आहे.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ५५० ट्रेन

रविवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मध्य रेल्वेने ३७१ मेल एक्सप्रेस गाड्या, १३३ प्रवासी गाड्या आणि ४६ उत्सव विशेष अर्थात फेस्टीव्हल स्पेशल ट्रेन अशा एकूण ५५० ट्रेनची प्रवाशांना सेवा दिली.

त्यांची रांत्रदिवस सेवामोटरमन, लोकोपायलट, ट्रेन मॅनेजर, नियंत्रक, स्टेशन मास्तर, टीटीई, आरपीएफ जवान, पॉइंट्समन, बुकिंग कर्मचारी, ट्रॅकमन, ट्रेन परिक्षण कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी रात्रंदिवस प्रवाशांना सेवा देत आहेत.

टॅग्स :railwayरेल्वेDiwaliदिवाळी 2023nagpurनागपूर