काटोलमध्ये पुन्हा चोऱ्या वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:11 IST2021-07-14T04:11:47+5:302021-07-14T04:11:47+5:30

काटोल : काटोल शहरात पुन्हा एकदा चोरट्यांची टोळी सक्रिय झाली आहे. चोवीस तासात चोरीच्या दोन घटना घडल्या असून यात ...

Thefts increased again in Katol | काटोलमध्ये पुन्हा चोऱ्या वाढल्या

काटोलमध्ये पुन्हा चोऱ्या वाढल्या

काटोल : काटोल शहरात पुन्हा एकदा चोरट्यांची टोळी सक्रिय झाली आहे. चोवीस तासात चोरीच्या दोन घटना घडल्या असून यात चोरट्याने एका जागी नवीन तवेरा गाडी पळविली तर दुसऱ्या चोरीत भरदिवसा १ लाख ४० हजाराची रोख लंपास केली.

चोरीच्या पहिल्या घटनेत शहरातील अर्जुन नगर परिसरातून १२ रोजी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी रोहिदास किशन डहाट यांची घरासमोर उभी असलेली एम.एच.३६-एफ.८२७१ क्रमांकाची तवेरा गाडी पळविली. दुसरी घटना बस स्थानक परिसरात घडली. येथे रोशन वंजारी हे स्कॉर्पिओ गाडीने जोशी लॉज येथे आले होते. त्यांनी गाडीतील १ लाख ४० हजाराची रक्कम काढून मित्राच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवली. ती रक्कम जमा करण्याकरिता वंजारी बँकेकडे निघाले. बँकेत पोहोचल्यानंतर डिक्कीत ठेवलेली रक्कम त्यांना गायब दिसली. यासंदर्भात त्यांनी काटोल पोलिसात तक्रार दाखल केली आहे. घटनेचा तपास अरुण भेंडे, विवेक गाढवे करीत आहेत.

Web Title: Thefts increased again in Katol