शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात महिला वकिलाच्या सदनिकेत धाडसी चोरी :१२ लाखांची रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 21:42 IST

रामदासपेठेतील एका महिला वकिलाच्या सदनिकेतून चोरट्याने १२ लाखांची रोकड चोरून नेली. ३० डिसेंबर ते २३ जानेवारीदरम्यान ही धाडसी चोरीची घटना घडली. मात्र, उशिरा तक्रार मिळाल्याने या प्रकरणात सीताबर्डी पोलिसांनी गुरुवारी चोरीचा गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्दे सीताबर्डीत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रामदासपेठेतील एका महिला वकिलाच्या सदनिकेतून चोरट्याने १२ लाखांची रोकड चोरून नेली. ३० डिसेंबर ते २३ जानेवारीदरम्यान ही धाडसी चोरीची घटना घडली. मात्र, उशिरा तक्रार मिळाल्याने या प्रकरणात सीताबर्डी पोलिसांनी गुरुवारी चोरीचा गुन्हा दाखल केला.अ‍ॅड. नंदिता रवींद्र त्रिपाठी (वय ४४) असे तक्रारकर्त्या महिलेचे नाव आहे. त्या उच्च न्यायालयात वकिली करतात. रामदासेपेठेतील वंदना हाऊसिंग सोसायटीत ई-२ मध्ये त्यांची सदनिका आहे.त्यांच्या वडिलांना हृदयविकार होता. त्यांच्या उपचारासाठी त्यांनी घर घेण्यासाठी जमा केलेले १२ लाख रुपये आपल्या सदनिकेत आणून ठेवले होते. दरम्यान, त्रिपाठी यांच्या वडिलांचे निधन झाल्याने त्या त्यांच्या भावासोबत गोव्याला गेल्या होत्या. तेथे काही दिवस राहिल्यानंतर त्या परत आल्या. २४ जानेवारीला त्यांनी शयनकक्षात ठेवलेली पैश्याची बॅग तपासली असता ती दिसली नाही. घरातील मंडळींकडे विचारणा केली असता त्यांनी अनभिज्ञता दर्शविली. त्यामुळे अ‍ॅड. त्रिपाठी यांनी सीताबर्डी पोलिसांकडे चोरीची तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणात तीन दिवस चौकशी केली. सीसीटीव्ही फुटेजही तपासले. त्या ज्यावेळी गोव्याला गेल्या होत्या त्यावेळी त्यांच्या सदनिकेत त्यांचे पती राहायचे आणि घरकाम करण्यासाठी मोलकरीण यायची. ही मोलकरीण अनेक वर्षांपासून त्यांच्याकडे काम करते. ती अत्यंत विश्वासातील आहे. मात्र, प्रकरण १२ लाखांच्या चोरीचे असल्यामुळे पोलिसांनी त्या महिलेला ठाण्यात आणून तिची प्रदीर्घ चौकशी केली. परंतु पोलिसांना संशयास्पद असे काही जाणवले नाही. त्यामुळे महिलेला सोडून देण्यात आले. या प्रकरणात गुरुवारी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील चौकशी करीत आहेत.

टॅग्स :theftचोरीnagpurनागपूर