उमरेडनजीक गावसूत येथे तीन ठिकाणी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:11 IST2021-08-15T04:11:56+5:302021-08-15T04:11:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : पोलिसांनी काही भुरटे चोरट्यांना अटक केल्यानंतरही परिसरात चोरीचे सत्र संपता संपेना, अशीच परिस्थिती दिसून ...

Theft at three places at Gavasut near Umred | उमरेडनजीक गावसूत येथे तीन ठिकाणी चोरी

उमरेडनजीक गावसूत येथे तीन ठिकाणी चोरी

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : पोलिसांनी काही भुरटे चोरट्यांना अटक केल्यानंतरही परिसरात चोरीचे सत्र संपता संपेना, अशीच परिस्थिती दिसून येत आहे. उमरेड येथून ७ किमी. अंतरावर असलेल्या तालुक्यातील गावसूत येथे गुरुवारी (दि.१२) मध्यरात्री ते शुक्रवारी सकाळी ६ वाजेदरम्यान तीन ठिकाणी घरफाेडी करीत चोरट्यांनी हात साफ केला. यामुळे परिसरात चांगलीच भीती निर्माण झाली आहे. तीन ठिकाणी झालेल्या चोरी प्रकरणात १ लाख १७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, राेख ६६ हजार असा एकूण १ लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.

गावसूत येथील गौतम सूर्यभान मेंढे कुटुंबीयांसाेबत घरीच होते. संपूर्ण कुटूंब घरात झाेपले असताना चोरट्यांनी दोन लोखंडी आलमारीतून ५४ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने तसेच राेख ४६ हजार रुपये असा एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल पळविला. तसेच गावातील लता चौधरी यांच्याकडेही चोरट्यांनी ६३ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि राेख २० हजार रुपये असा एकूण ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. तसेच विठ्ठल वालकटे यांच्याकडील ११ हजार रुपये किंमतीचा मोबाईलवर चोरट्यांनी हात मारला. याप्रकरणी गाैतम सूर्यभान मेंढे (४०, रा. गावसूत, ता. उमरेड) यांच्या तक्रारीवरून उमरेड पाेलिसांनी भादंवि कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या गुन्ह्याचा पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक राजू डाेर्लीकर करीत आहेत.

Web Title: Theft at three places at Gavasut near Umred