रेल्वेस्थानकावर प्रवाशाच्या मोबाईलची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:09 IST2021-07-14T04:09:36+5:302021-07-14T04:09:36+5:30

नागपूर : रेल्वेगाडीतून उतरताना प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन एका प्रवाशाचा २३ हजार रुपये किमतीचा मोबाईल अज्ञात आरोपीने चोरी केला. ...

Theft of passenger's mobile at railway station | रेल्वेस्थानकावर प्रवाशाच्या मोबाईलची चोरी

रेल्वेस्थानकावर प्रवाशाच्या मोबाईलची चोरी

नागपूर : रेल्वेगाडीतून उतरताना प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन एका प्रवाशाचा २३ हजार रुपये किमतीचा मोबाईल अज्ञात आरोपीने चोरी केला. ही घटना नागपूर रेल्वेस्थानकावर रविवारी दुपारी ३.३० वाजता घडली.

अमन विजय ताजन (२०) रा. बजेरिया, नागपूर हे रेल्वेगाडी क्रमांक ०२८४३ पुरी-अहमदाबाद विशेष रेल्वेगाडीने कोच एस-५, बर्थ क्रमांक ३५ वरून डोंगरगड ते नागपूर असा प्रवास करीत होते. ही गाडी रविवारी दुपारी ३.३० वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर आली. गाडी थांबल्यानंतर प्रवाशांनी खाली उतरण्यासाठी कोचच्या दारावर गर्दी केली. त्यामुळे गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात आरोपीने त्यांचा २३ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरी केला. गाडीखाली उतरल्यानंतर त्यांना मोबाईल चोरीला गेल्याचे समजले. त्यामुळे सोमवारी त्यांनी मोबाईलचे बिल घेऊन लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून रेल्वेस्थानकावर मोबाईल चोरट्यांची टोळी सक्रिय झाली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

...................

Web Title: Theft of passenger's mobile at railway station