शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एटीएममध्ये प्लॉस्टिकच्या पट्टी टाकून केली पेशांची चोरी

By दयानंद पाईकराव | Updated: September 10, 2024 17:24 IST

आरोपीस अटक : हुडकेश्वर पोलिसांनी काढले हुडकून

नागपूर : एटीएममध्ये प्लॉस्टीकच्या पट्टी टाकून पैशांची चोरी करणाऱ्या आरोपीला हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल होताच १२ तासाच्या आत अटक करून आरोपीच्या ताब्यातून चोरीसाठी वापरलेल्या प्लॉस्टीकच्या २१ पट्ट्यासह ३० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मोहम्मद इस्तियाक मोहम्मद यासीन (२३, रा. गोहनिया, अलाहाबाद उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ७ सप्टेंबरला सकाळी ८.१५ वाजताच्या सुमारास मानेवाडाच्या परिवर्तन चौकात अ‍ॅक्सीस बँकेच्या एटीएम मशीनला पट्टी लाऊन कोणीतरी टँपरींग करण्याचा प्रयत्न करीत असल्याची तक्रार बँकेचे दुर्गेश अरुण कोळंबकर (३९, रा. ब्राह्मणी कळमेश्वर) यांनी हुडकेश्वर पोलिसांना दिली. हुडकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन अनोळखी आरोपीविरुद्ध कलम ३०५ (अ), ३३१ (३) नुसार गुन्हा दाखल केला. तपासात हुडकेश्वरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर, निरीक्षक नागेशकुमार चातरकर, ओमप्रकाश भलावी, गोपाल देशमुख, संदिप पाटील, संतोष सोनटक्के, दिनेश गाडेकर, चेतन वेद्य, तारा अंबाडरे, विजय सिन्हा, मंगेश मडावी, हिमांशू पाटील यांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रीक तपास करून पोलिसांनी हुडकेश्वर रोडवरील अ‍ॅक्सीस बँकेजवळ संशयास्पद स्थिती दिसलेल्या व्यक्तीला आवाज दिला असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने प्लास्टीक पट्टीचा वापर करून एटीएममधील पैशांची चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीच्या ताब्यातून रोख ९६०० रुपये, प्लास्टीकच्या २१ पट्ट्या, मोबाईल असा एकुण ३० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी