कपिलनगरात चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:49 IST2021-02-05T04:49:36+5:302021-02-05T04:49:36+5:30
नागपूर : वृद्ध महिला घरात एकटीच असल्याचे पाहून चोरट्याने तिच्या घरातून रोख ५० हजार आणि सोन्याचे दागिने असा एकूण ...

कपिलनगरात चोरी
नागपूर : वृद्ध महिला घरात एकटीच असल्याचे पाहून चोरट्याने तिच्या घरातून रोख ५० हजार आणि सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख, १५ हजारांचा ऐवज चोरून नेला. गणराज्य दिनी कपिलनगरात ही घटना घडली.
श्यामराव महादेवराव गाडेकर (वय ५६) हे खसाळा नाका नंबर २ जवळ राहतात. मंगळवारी ते सहपरिवार बाहेर गेले होते. घरात त्यांची वृद्ध आई एकटीच होती. सायंकाळी ५.३० च्या सुमारास एक भामटा त्यांच्या घरात शिरला. त्याची चाहूल लागताच श्यामराव यांच्या आईने कोण आहे, अशी विचारणा केली. त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत चोरट्याने घरात रोख आणि दागिने शोधणे सुरू केले. दरम्यान, चोरटा घरात शिरल्याचे ध्यानात आल्याने वृद्धा शेजाऱ्यांना सांगण्यासाठी बाहेर गेल्या. त्या परत आल्या तेव्हा चोरटा रोख आणि दागिने घेऊन पळून गेला होता. श्यामराव घरी परतल्यानंतर त्यांना हा प्रकार कळला. त्यांनी कपिलनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. चोरट्याचा शोध घेतला जात आहे.
----