नागपूर : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. त्या काळात देशाला योग्य असे ‘संविधान’ देण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. हे संविधान ज्या टाइपरायटरवर टाइप केले गेले, तो टाइपरायटर सध्या नागपुरातील चिचोली येथील शांतिवनमधील डॉ. बाबासाहेबांच्या वस्तू संग्रहालयात जपून ठेवण्यात आला आहे. बाबासाहेबांशी संबंधित इतर अनेक वस्तूही येथे संग्रहित आहे. या सर्वांचे दर्शन घेण्यासाठी लाखो नागरिक शांतिवनला भेट देतात.
नागपूरमध्ये कसे आले?चिचोली शांतिवनाचा कार्यभार पाहणारे संजय पाटील यांच्यानुसार १९९१ साली डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खासगी सचिव नानकचंदजी रत्तू यांनी बाबासाहेबांचे सर्व साहित्य भारतीय बौद्ध परिषदेचे सचिव वामनराव गोडबोले यांच्याकडे सुपूर्द केले. गोडबोले यांना दानात मिळालेल्या जमिनीवर शांतिवनाची उभारणी करण्यात आली आणि त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कोट, खुर्ची, टोपी, टाय, पेन, कप, बूट, मोजे इत्यादी वस्तू संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः केले टाइप देश घडविण्याचे महान कार्य बाबासाहेबांनी ‘संविधान’ लिहून केले. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी ‘संविधान’ पूर्ण झाले आणि २६ जानेवारी १९५० या गणतंत्रदिनी डॉ. बाबासाहेबांनी देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना देशाचे ‘संविधान’ सुपूर्द केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचे ‘संविधान’ दिल्लीमध्ये लिहिले आणि त्या काळातील टाइपरायटरवर स्वतःच्या हाताने टाइप केले होते.
संविधान टाइप केलेला टाइपरायटर विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. येथे दोन टाइपरायटर आहेत. एका टाइपरायटरवर ‘देशाचे संविधान’ टाइप केले, तर दुसऱ्यावर ‘द बुद्धा अँड हिज धम्मा’ हा ग्रंथ टाइप केला होता.
Web Summary : Dr. Ambedkar's constitution typewriter rests in Nagpur's Shanti Van. Nanakchandji Rattu entrusted Ambedkar's items to Wamanrao Godbole in 1991. The typewriter, used for the constitution and 'The Buddha and His Dhamma', attracts visitors.
Web Summary : डॉ. अम्बेडकर का संविधान टाइपराइटर नागपुर के शांति वन में है। नानकचंदजी रत्तू ने 1991 में अम्बेडकर की वस्तुएँ वामनराव गोडबोले को सौंपीं। संविधान और 'द बुद्धा एंड हिज़ धम्मा' के लिए इस्तेमाल किया गया टाइपराइटर आगंतुकों को आकर्षित करता है।