शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

देशात असहकार आंदोलनाची गाडी नागपूर स्थानकावरूनच सुटली होती सुसाट

By नरेश डोंगरे | Updated: January 15, 2025 21:35 IST

खुद्द म. गांधींनी दिली होती स्थानकाला भेट : १०० वर्षांचा

नागपूर : जुलमी ब्रिटिशांविरुद्ध असहकार आंदोलनाच्या वणव्याची ज्वाला देशभर पेटविण्यासाठी नागपूर रेल्वे स्थानक परिसराने महत्वाची भूमीका वठविली. खुद्द महात्मा गांधी यांनीच नागपूर रेल्वे स्थानकावर येऊन, येथून पुढे जाताना ज्वाजल्य राष्ट्रभक्तीची ज्योत देशातील विविध भागात नेली होती. आज नागपूर रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनाला १०० वर्षे पूर्ण झाले असून त्या पार्श्वभूमीवर, ही घडामोडही अधोरेखित झाली आहे.

देशाच्या हृदयस्थळी असलेले नागपूर आपल्या राजवटीसाठी अत्यंत महत्वाचे स्थळ असल्याचे ध्यानात आल्याने ब्रिटिशांनी येथे रेल्वे स्थानक निर्मितीला सुरूवात केली. ते तयार झाले आणि नागपूर रेल्वे स्थानकावर पहिली रेल्वेगाडी १८६७ ला पोहचली. नंतर येथून ठिकठिकाणचे मार्ग ईंग्रजांनी प्रशस्त केले. त्यानंतर १९२० ला या स्थानकाला 'नागपूर जंक्शन' असे नाव देण्यात आले. ईकडे १ ऑगस्ट १९२० ला देशात ब्रिटिशांविरुद्ध असहकार आंदोलन सुरू झाले. भारताचे हृदयस्थळ असलेल्या नागपूर-विदर्भात त्याचा वणवा पेटला. त्यामुळे म. गांधी नागपुरात आले. त्यांनी येथील रेल्वे स्थानकावर काही वेळ वास्तव्य करीत देशभक्तांना दिशानिर्देश दिले अन् येथून ते पुढे मार्गस्थ झाले. त्यानंतरच्या पाच वर्षांनी अर्थात १५ जानेवारी १९२५ ला तत्कालीन मध्य प्रांताचे राज्यपाल सर फ्रँक स्लाय यांच्या हस्ते नागपूर रेल्वे स्थानकाच्या शानदार ईमारतीचे उद्घाटन झाले. आज त्याला १०० वर्षे पूर्ण झाली आहे.रोज २८३ गाड्यांचे संचालन

येथून दररोज २८३ गाड्यांचे संचालन-व्यवस्थापन केले जाते. त्यातील ९६ गाड्या येथून सुटतात आणि समाप्त होतात. देशाच्या विविध भागात नागपूरहून थेट १८ गाड्या सोडल्या जातात.वर्षभरात २ कोटी ३६ लाख प्रवासी

गेल्या वर्षभरात नागपूर स्थानकावरून २ कोटी, ३६ लाख, प्रवाशांचे आवागमन झाले आहे. रोज सरासरी येथून ६८,७२९ प्रवासी येणे-जाणे करतात.तीन वेगवेगळ्या वंदे भारतचे संचालन

येथून नागपूर बिलासपूर, नागपूर उज्जैन इंदोर आणि नागपूर सिकंदराबाद या तीन वंदे भारत एक्सप्रेसचे संचालन केले जाते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी नागपूर स्थानकाला जागतिक दर्जाचे स्थानक बणविण्यासाठी ४८८ कोटींच्या पुनर्विकास प्रकल्पाचे उद्घाटन केले.