शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा योजनांच्या देखरेखीसाठी गठित उपसमितीच हरवली !

By गणेश हुड | Updated: November 23, 2023 13:53 IST

निकृष्ट कामे करणाऱ्यांवर कारवाई कशी होणार ?

नागपूर : केंद्र शासनाने २०२४ पर्यंत हंडामुक्त समाज करण्याचा संकल्प केला आहे. जलजीवन मिशन कार्यक्रमाच्या माध्यमातून नागपूर जिल्ह्यातील १३२२ पाणीपुरवठा योजनांना मंजुरी दिली आहे. यासाठी ५७८ कोटींचा निधी मंजूर केला. परंतु या योजनेच्या माध्यमातून होत असलेली कामे निकृष्ट असल्याच्या तक्रारी आहेत. याचा विचार करता योजनांच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी एक उपसमिती गठित करण्यात आली. परंतु अद्याप या उपसमितीची एकही बैठक झालेली नाही.

सरकारी योजनांच्या कामाचा दर्जा निकृष्ट असतो. अनेकदा कामे रेंगाळत ठेवली जातात. त्यामुळे वर्षानुवर्षे योजना पूर्णच होत नाही. नंतर अनेक तांत्रिक कारणे समोर केली जाते. ठेकेदार सरकारी अधिकाऱ्यांना जबाबदार धरतात, तर अधिकारी ठेकेदारांवर ठपका ठेवून मोकळे होतात.

नागपूर जिल्ह्यातील अनेक पाणीपुरवठा योजनांची कामे काही मोजक्याच कंत्राटदारांना देण्यात आलीत. यामुळे काही कामे प्रलंबित असल्याचा आरोप जि. प. सदस्यांनी सभागृहात केला होता. अशा प्रकारांना आळा बसावा, योजनांचा लाभ ग्रामस्थांना मिळावा, यासाठी जिल्हा परिषदेने उपसमिती गठित केली होती. मात्र या समितीची अडीच महिन्यांत एकही बैठक झालेली नाही. समितीची बैठक होत नसल्याने पाणीपुरवठा योजनांची कामे निकृष्ट होत असतील तर त्याला आळा कसा बसणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदWaterपाणीnagpurनागपूर