सुमेध वाघमारे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बदलती जीवनशैली, प्रदूषण व इतरही कारणांमुळे आजार वाढले आहेत. यात महत्त्वाचे अवयव निकामी होण्याचे प्रमाणही मोठे आहे. दुसरीकडे वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे निकामी झालेले अवयव बदलणे शक्य झाले आहे. मात्र, या शस्त्रक्रियांचा खर्च हा सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचा आहे. उदा. यकृत, फुप्फुस, हृदय प्रत्यारोपणाला लागणारा खर्च हा मध्यमवर्गीयांनाही परवडणारा नाही. या रुग्णांवर आर्थिक मदतीची याचना करण्याची वेळ येत आहे.
अवयवदानाचे महत्त्व घराघरात पोहोचता आहे. दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानादेखील समाजभान राखत अवयवदानाचा निर्णय घेतला जात आहे. मृत्यूनंतरही त्यांना अवयवरूपी जिवंत ठेवून अवयवाच्या प्रतीक्षेत मृत्यूच्या दाढेत जगणाऱ्यांना नवआयुष्य दिले जात आहे. मात्र, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत केवळ मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्याच खर्चाचा समावेश असल्याने इतर अवयवांचे प्रत्यारोपण जे या शस्त्रक्रियेचा खर्चाचा भार उचलू शकतील त्यांनाच मिळत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
एम्स'मध्ये सीएसआर निधीतून बोनमॅरो ट्रान्सप्लांट
- विदर्भात सिकलसेल व बॅलेसेमियाबाधित रुग्णांची संख्या मोठी आहे. यातील काही रुग्णांसाठी बोनमॅरो ट्रान्सप्लांट पर्याय ठरू शकते; परंतु जनआरोग्य योजनेत या शस्त्रक्रियेचा समावेश नाही.
- त्यामुळे 'एम्स'ने स्वतःहून पुढाकार घेत 'सीएसआर' निधी मिळून सात रुग्णांचे ट्रान्सप्लांट केले आहे.
- जर हा 'सीएसआर' निधी यकृत व 3 इतरही अवयवाच्या प्रत्यारोपणासाठी मिळाल्यास रुग्णांचे जीव वाचविणे शक्य आहे.
मोजक्याच एम्स, मेडिकलमध्येच प्रत्यारोपणविदर्भात केवळ नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) व नागपूरच्याच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) जनआरोग्य योजनेतून मूत्रपिंड प्रत्यारोपण केले जाते; परंतु या दोन्ही ठिकाणी या अवयवांची गरज असलेल्या रुग्णांची प्रतीक्षा यादी मोठी आहे.
शरीरातील अवयव बदलांसाठी खर्च किती?अवयव अंदाजित खासगी रुग्णालयातील खर्चकिडनी (मूत्रपिंड) प्रत्यारोपण ८ लाख ते १५ लाखयकृत (लिव्हर) प्रत्यारोपण १५ लाख ते २५ लाखहृदय प्रत्यारोपण २५ लाख ते ४० लाखफुप्फुसे प्रत्यारोपण ३० लाख ते ५० लाखनेत्र (कॉर्निया) प्रत्यारोपण ५० हजार ते १ लाखदाताचे इम्प्लांट ३० हजार ते १ लाख प्रति दात
"अवयव प्रत्यारोपण हे अनेक रुग्णांसाठी जीवनदान ठरते; परंतु त्याचा खर्च खूप जास्त असतो. सरकारने प्रत्येक शासकीय रुग्णालयांमध्ये सर्वच अवयव प्रत्यारोपणाची निःशुल्क सोय उभी करायला हवी किंवा महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सर्व अवयव प्रत्यारोपणाचा समावेश करायला हवा. ज्यामुळे प्रत्यारोपणाचा लाभ सर्व रुग्णांना घेता येईल. सामाजिक संस्थांनीसुद्धा यात सहकार्य करणे गरजेचे आहे."- डॉ. संजय कोलते, अध्यक्ष विभागीय प्रत्यारोपण समन्वय समिती (झेडटीसीसी), नागपूर