शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आरएसएसचादेखील मुस्लिम सेल, मग संघाला 'जनाब संघ' म्हणणार का ? संजय राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2022 17:58 IST

संघाचादेखील मुस्लिम सेल आहे, मग संघाला जनाब संघ म्हणणार का ? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

नागपूरआरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे गेल्या काही काळातील भाषण ऐकलीत किंवा संघाने मुस्लिम समाजासाठी राष्ट्रीय मुस्लिम विचार मंचची स्थापना केली. मग संघाला जनाब संघ म्हणणार का? असा सवाल संजय राऊत यांनी भाजपला केला आहे.

शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने संजय राऊतनागपूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संपर्क साधला. यावेळी, त्यांनी भाजप सरकारला धारेवर धरले. 

केंद्रीय तपास यंत्रणेचा खुळखुळा झालाय. भाजप देशभरात सुडाचे राजकारण करत आहेत. जिथे भाजपचे सत्ता नाही त्या राज्यांमध्ये ईडीच्या कारवाया होत आहेत. माझ्यासह कुटुंबीयांवरही आरोप करण्यात आले. परंतु, दहशत निर्माण करून सरकार पाडता येणार नाही. दहशत हा शब्द आमच्या डिक्शनरीत नाही. महाराष्ट्र दिल्लीसमोर वाकणार नाही, असे राऊत म्हणाले.

विदर्भाच्या जनतेने बाळासाहेब आणि शिवसेनेवर प्रेम केले, खासदार निवडून दिले. परंतु, गेल्या काही काळापासून विधानसभेतील विदर्भातून शिवसेनेचं प्रतिनिधित्व कमी झालं असून त्याला काही कारणं आहेत. ते कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. युतीच्या काळात विदर्भाच्या जागा भाजपने घेतल्या आणि आमची विदर्भात पीछेहाट झाली. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून कामाला चालना देण्यासाठी आम्ही काम करत आहोत. नागपूर ही राज्याची उपराजधानी आहे. त्यामुळे सुरुवात नागपुरातून करत असल्याचे राऊत यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाnagpurनागपूर