शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
2
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
3
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
4
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
5
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
6
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
7
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
8
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
9
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
10
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
11
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
12
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
13
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
14
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
15
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
16
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
17
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
18
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
19
मैत्रिणीसोबत थांबला होता फ्लॅटमध्ये, तरुणाने अचानक ३२व्या मजल्यावरून मारली उडी
20
IB Recruitment: गुप्तचर विभागात ज्युनियर ऑफिसर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता

वाहतुकीच्या 'सुरक्षिततेचे रिपोर्ट कार्ड' तुमचे डोळे उघडेल ! नागपूर वाहतुकीसाठी किती धोकादायक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 18:25 IST

'आयटीडीपी'चा सर्वेक्षण अहवाल : महापालिका कसे देणार आव्हानांना तोंड?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील रस्त्यांच्या सुरक्षिततेवर महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच जाहीर झाला आहे. आयटीडीपी (इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्स्पोर्टेशन अॅण्ड डेव्हलपमेंट पॉलिसी) संस्थेने केलेल्या या अभ्यासानुसार, नागपुरातील केवळ वर्धा रोड वाहतुकीच्या दृष्टीने सुरक्षित असल्याचे आढळून आले आहे. तर सेंट्रल बाजार रोड, शंकरनगर रोड, अमरावती रोड, ऑरेंज सिटी रोड आणि रिंग रोड हे रस्ते प्रवाशांसाठी अपुऱ्या सुरक्षिततेमुळे धोकादायक ठरत असल्याचे अहवालात नमूद आहे.

मार्च २०२४ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत आयटीडीपी संस्थेने शहरातील प्रमुख रस्त्यांचे सर्वेक्षण केले. या अभ्यासाचा अहवाल नुकताच सोमवारी प्रसिद्ध झाला, रस्त्यांचे संचालन, सुरक्षा, सुलभता आणि सर्वसमावेशकता या निकषांवर आधारित या सर्वेक्षणात वर्धा रोड वगळता बाकी रस्त्यांनी समाधानकारक कामगिरी केलेली नाही. रहाटे कॉलनी चौक ते अजनी चौक या १.३ किलोमीटर लांबीच्या पट्टयाला ३० पैकी तब्बल २४.७५ गुण मिळाले आहेत. डिझाइनपासून निरीक्षणापर्यंत बहुतेक निकषांवर हा रस्ता उभा राहिला आहे. विशेष म्हणजे, ८० टक्के नागरिकांनी या पट्टयाला 'चालण्यासाठी, सायकलसाठी व वाहतुकीसाठी सुरक्षित' असल्याचं मान्यता दिली आहे. या रस्त्यावर पायी चालणारे नागरिक प्रामुख्याने फुटपाथवरूनच चालताना दिसून आले. नॉन मोटराइज्ड ट्रान्सपोर्ट (एनएमटी) साठी स्वतंत्र पट्टा असून बसण्यासाठी व चालण्यासाठी योग्य व्यवस्था आहे. तसेच, जंक्शनही सुरक्षित असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे. मात्र, काही ठिकाणी फुटपाथवर पार्किंग आढळली असून सायकलिंगसाठी अजूनही विशेष व्यवस्था नाही, हा कमीपणाही अधोरेखित करण्यात आला आहे.

पायी चालणाऱ्यांना, सायकलस्वारांना सुरक्षित नाहीवर्धा रोड वगळता उर्वरित रस्त्यांवर पायी चालणाऱ्यांची व सायकलस्वारांची अवस्था अत्यंत असुरक्षित आहे. रस्ता ओलांडताना सुरक्षित वाटत नाही, जंक्शनजवळ अपघाताची भीती सतत वाटते. सायकलिंगसाठी कुठलीही व्यवस्था नाही आणि इंटरकनेक्टिव्हिटीचाही अभाव आहे. फुटपाथ अर्धवट, खंडित किंवा अतिक्रमित आहेत. सेंट्रल बाजार रोड (लोकमत चौक ते बजाजनगर चौक) व रिंग रोड या मार्गावर तर पायी चालणाऱ्यांना रस्त्यावरूनच जावे लागते. फुटपाथ कुठे आहेत, तर तिथे दुकानदार व वाहनचालकांनी अतिक्रमण केलेले आहे. रिंग रोडवर सायकलस्वारांची संख्या अधिक असूनही त्यांच्या सुरक्षेसाठी कोणतीही पायाभूत सुविधा उपलब्ध नाही. सर्वेक्षणात या सगळ्या अडचणी ठळकपणे नोंदवण्यात आल्या आहेत.

या रस्त्यांवर अपघाताचे धोकेस्पीड गन वापरून केलेल्या स्पीड सर्वेक्षणात बहुतेक रस्त्यांवर ताशी ६० किलोमीटरपेक्षा जास्त वाहनांचा वेग आढळून आला. ऑरेंज सिटी रोड आणि अमरावती रोडवर दुचाकींचा वेग ताशी ७५ किलोमीटरपर्यंत नोंदविण्यात आला. हा वेग राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षित रस्त्यांच्या डिझाइन मार्गदर्शक तत्त्वांपेक्षा जास्त आहे. ज्यामुळे मृत्यूचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. शहरांमध्ये आदर्श वेग मर्यादा सुमारे ३०-४० किलोमीटर प्रति तास असावी, असे सर्वेक्षणात नोंदविण्यात आले आहे. 

सुरक्षित व सर्वसमावेशक रस्ते करू"या अभ्यासामुळे आपल्याला कुठे सुधारणा करावी लागेल हे स्पष्टपणे कळते. आम्ही या शिफारशी शहरपातळीवर लागू करून, सुरक्षित व सर्वसमावेशक रस्ते तयार करू."- वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त, नागपूर महापालिका 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीnagpurनागपूर