शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

नकली टीसी, दलाल, बनावट तिकीटे आणि बोगस विक्रेत्यांचा सुळसुळाट

By नरेश डोंगरे | Updated: March 23, 2026 20:26 IST

बोगसगिरीमुळे रेल्वे प्रशासनाच्या नाकी नऊ : वारंवार कारवाई; मात्र बनावटगिरीला चाप नाही

नरेश डोंगरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्यांमुळे रेल्वेची आधीच डोकेदुखी वाढलेली असताना आता बनावट तिकीटे, नकली टीसी,दलाल आणि बोगस विक्रेत्यांमुळे रेल्वे प्रशासनाची चिंता अधिकच वाढली आहे. या प्रकारामुळे रेल्वेच्या महसुलावर आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

देशातील विविध भागात विनातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाला वर्षभर ताप दिला जातो. त्यामुळे फुकट्यांना वठणीवर आणण्यासाठी अधून-मधून स्पेशल ड्राईव्ह केला जातो. चेकिंग स्टाफ विविध रेल्वे गाड्या आणि रेल्वे स्थानकावर उभा होऊन फुकट्या प्रवाशांना पकडून त्यांना दंडाचा फटका देतात. तरीसुद्धा हा गैरप्रकार कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसतो.

आरक्षण तिकिटांच्या नावाखाली प्रवाशांची आर्थिक लुट करण्याचे प्रकार जुनेच आहे. हे दलालदेखिल सर्वत्र आढळतात. रेल्वेतील प्रवाशांच्या काही प्रवासी अलिकडे अॅपच्या माध्यमातून बनावट तिकिट तयार करून प्रवास करताना आढळतात. तर, कधी प्रयागराज, कधी इंदोर, भोपाळ तर कधी वेगवेगळ्या ठिकाणी नकली टीसी पकडले जातात.

अलीकडेच चिंचपोकळी येथे रेल्वे अधिकाऱ्यांनी एका आरोपीला पकडले. धक्कादायक बाब म्हणजे हा व्यक्ती स्वतःला टीसी असल्याचे भासवून रेल्वेत फिरत होता. त्याच्याकडे टीसी असल्याचे भासवणारे बनावट ओळखपत्रही आढळून आले.

बोगस विक्रेत्यांचाही सुळसुळाट

रेल्वेत बोगस विक्रेत्यांचाही सुळसुळाट झाल्याचे नेहमीचेच चित्र आहे. रेल्वे प्रशासनाने अधिकृत स्कॅनर असलेले नोंदणीकृत विक्रेते नियुक्त केले असले, तरी जवळपास दररोजच विविध गाड्यांमध्ये बोगस विक्रेते पकडले जातात. हे विक्रेते आईसक्रीम, कोल्ड्रिंक तसेच इतर खाद्यपदार्थांची विक्री करताना दिसतात.

विशेष म्हणजे, या विक्रेत्यांकडे बिसलरी, अॅक्वा यांसारख्या नामांकित ब्रँड्सची नक्कल केलेल्या पाण्याच्या बाटल्याही आढळून येतात. कंपनीचे नाव आणि लोगोची हुबेहूब नक्कल करण्यात येत असल्याने प्रवासी सहजपणे फसतात. अशा बनावट उत्पादनांमुळे प्रवाशांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होतो.

''असे गैरप्रकार होत आहेत. मात्र, प्रशासनाकडून त्याला आळा घालण्याचे नियमित प्रयत्न सुरू आहेत. उन्हाळ्यात गर्दी वाढते. त्यामुळे या संबंधाने रेल्वेच्या रनिंग स्टाफला विशेष सूचना देण्यात आल्या असून स्पेशल ड्राईव्ह सुरू करण्यात आले आहेत. प्रवाशांनी सतर्कता बाळगून सहकार्य केल्यास असे गैरप्रकार रोखणे सहज शक्य आहेत.''- अमन मित्तल, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे नागपूर विभाग 

English
हिंदी सारांश
Web Title : Fake Ticket Inspectors, Agents, and Vendors Plague Railways.

Web Summary : Railways face rising issues: fake tickets, TCs, and vendors cheat passengers. Revenue loss and safety risks increase due to these scams. Special drives are ongoing to curb these illegal activities; passenger cooperation is crucial.
टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेnagpurनागपूर