शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
3
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
4
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
5
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
6
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
7
IT क्षेत्राला मोठा धक्का! इन्फोसिस, TCS, विप्रोचे शेअर्स धडाधड कोसळले; अमेरिकन कंपनीच्या एका निर्णयाचा फटका
8
Gold Silver Price 23 June: इराण-इस्रायल युद्धादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
11
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
12
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
13
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
14
लेकाला मांडीवरुन घेऊन कार्तिकीचा केला गाण्याचा सराव, शेअर केला क्युट व्हिडिओ
15
"माझी मुलगी आधी एअर इंडियात पायलट होती...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अलका कुबल म्हणाल्या...
16
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
17
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
18
BEL Stock Price: 'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
19
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
20
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन

By नरेश डोंगरे | Updated: May 6, 2025 21:49 IST

Nagput News: जिवापाड प्रेम करणाऱ्या तरुणीने त्याला बेईमानीचा डंख मारला. तो चिडला, वाद वाढल्यानंतर तिने त्याच्यावर नको ते आरोप लावत विनयभंगाची तक्रार नोंदवली. परिणामी तो खचला अन् त्याने रखरख्यात उन्हात विषप्राशन करून रेल्वे स्थानक परिसरात आपल्या आयुष्याचा अखेर करून घेतला.

- नरेश डोंगरेनागपूर - जिवापाड प्रेम करणाऱ्या तरुणीने त्याला बेईमानीचा डंख मारला. तो चिडला, वाद वाढल्यानंतर तिने त्याच्यावर नको ते आरोप लावत विनयभंगाची तक्रार नोंदवली. परिणामी तो खचला अन् त्याने रखरख्यात उन्हात विषप्राशन करून रेल्वे स्थानक परिसरात आपल्या आयुष्याचा अखेर करून घेतला. 'बेवफा प्रेयसी'चा बळी ठरलेल्या या तरुणाच्या आत्मघातामुळे त्याच्या कुटुंबियांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. मनाला चटका लावणारी ही घटना मंगळवारी सायंकाळी चर्चेला आली. मृत तरुण वर्धा जिल्ह्यातील आष्टी जवळचा राहणारा आहे.

मंगळवारी दुपारी १ च्या सुमारास एक तरुण (वय २४) रेल्वे पोलीस स्टेशनपासून काही अंतरावर अचानक पडला. आजुबाजुच्यांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्याला पाणी वगैरे पाजण्याचा प्रयत्न केला. प्रारंभी त्याला उन्हाचा तडाखा बसला असावा, असा अंदाज होता. मात्र, त्याच्या तोंडातून फेस तसेच विषासारखा उग्र दर्प येत असल्याने त्याने विष प्राशन केल्याचा संशय बळावला. रेल्वे पोलिसांनी त्याला तातडीने मेयो हॉस्पिटलमध्ये भरती केले. उपचार सुरू असताना तेथे सायंकाळी ५ च्या सुमारास त्याने शेवटचा श्वास घेतला.

दरम्यान, या तरुणाजवळ एक स्पोर्ट बॅग होती. त्यात त्याचे कपडे, आधार कार्ड आणि अन्य काही कागदपत्रे होती. त्यावरून त्याचे नाव, पत्ता स्पष्ट झाला. रेल्वे पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांशी संपर्क साधून त्यांना ही माहिती कळविली. हा घटनाक्रम सुरू असताना आणि तो तरुण रेल्वे स्थानक परिसरात खाली पडण्यापासून तो रुग्णालयात नेण्यापर्यंत त्याने बेवफा प्रेयसीबाबत काही बाबी उघड केल्याची चर्चा आहे. तिने त्याच्याशी धोकेबाजी करतानाच शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दिल्याचे त्याला माहिती पडले. बेईमान प्रेयसीकडून अशा प्रकारे घात झाल्याने तरुण खचला. पोलिसांकडून कारवाई, कोर्ट-कचेरी तसेच आपली आणि कुटुंबियांची बदनामी होईल, या विचाराने त्याने विष प्राशन करून जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेतला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.

ती कोण, कुठली ?रेल्वे पोलिसांनी मृत तरुणाच्या कुटुंबियांना माहिती दिली असली तरी वृत्त लिहिस्तोवर ते येथे आले की नाही, ते स्पष्ट झाले नाही. या तरुणाशी विश्वासघात करून त्याला आत्मघात करण्यास बाध्य करणारी ती तरुणी कोण, कुठली ते सुद्धा वृत्त लिहिस्तोवर उघड झाले नव्हते. तपासात या बाबी उघड होतील, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर